गडहिंग्लज : कोल्हापूरच्या राज इव्हेंटतर्फे आयोजित येथील मुलींचे हायस्कूलनजीकच्या मैदानावर राज्यस्तरीय संजीवनी कृषी प्रदर्शनास तीन दिवसांत सुमारे लाखांवर कृषिप्रेमींनी भेट दिली. आज, सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शेतीसंबंधी विविध स्टॉल्स् व तज्ज्ञांच्याद्वारे माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. ऊस, केळी, फळे व फुले या शेतीमालाची स्पर्धाही भरविण्यात आली आहे.शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे, बि-बियाणे, खते व जंतुनाशके, जलसिंचनाच्या पद्धती, टिश्चू-कल्चर, कृषिव्यवस्थापन, शेती अर्थपुरवठा, बँकिंग इन्शुरन्स, मार्केटिंग व्यवस्थापन, रोपवाटिका, पाणी व्यवस्थापन, शासकीय व खासगी संस्था संघटनाआणि शासकीय एजन्सीज्, दुग्ध व्यवसाय, अपारंपरिक ऊर्जा, मत्स्योेत्पादन, रेशीम उद्योग, अन्न प्रक्रिया व साठवणूक, पॅकेजिंग पद्धती आदींविषयांसंबंधी सुमारे १५० स्टॉल्स् मांडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
गडहिंग्लजमधील संजीवनी कृषी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: February 9, 2015 00:39 IST