शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ निधी कामगारांवर खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:28 IST

कोल्हापूर : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या महाराष्टÑ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकराच्या माध्यमातून ६ हजार कोटी जमा असून, ते कामगारांच्या कल्याणासाठी खर्च करावयाचे आहेत; परंतु यामधील फक्त १२७ कोटी रुपयेच गेल्या सात वर्षांत कामगारांवर खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित निधी कामगारांवर खर्च करावा, यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य बांधकाम कामगार ...

ठळक मुद्देभ्रष्ट कामगार आयुक्तांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी.फक्त १२७ कोटी रुपयेच गेल्या सात वर्षांत कामगारांवर खर्च करण्यात आले आहेतमहाराष्टÑ सरकारकडे राज्यात ४५ लाख कामगार असल्याचे नमूद

कोल्हापूर : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या महाराष्टÑ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकराच्या माध्यमातून ६ हजार कोटी जमा असून, ते कामगारांच्या कल्याणासाठी खर्च करावयाचे आहेत; परंतु यामधील फक्त १२७ कोटी रुपयेच गेल्या सात वर्षांत कामगारांवर खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित निधी कामगारांवर खर्च करावा, यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य बांधकाम कामगार फेडरेशन (आयटक)तर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी एकच्या सुमारास बांधकाम कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यामुळे परिसर दणाणून गेला. यानंतर शिष्टमंडळाने नायब तहसीलदार (गृह) एन. व्ही. शेळकंदे यांना निवेदन सादर केले.कल्याणकारी मंडळाकडे जमलेल्या उपकरातून इतर राज्यांनी ४० टक्के लाभ कामगारांना दिला. त्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण दोन टक्केच आहे. कामगार संघटनांनी सर्वाेच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या केसमध्ये महाराष्टÑ सरकारकडे राज्यात ४५ लाख कामगार असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात मागीलसात वर्षांमध्ये यातील फक्त पाच लाख ७५ हजार ६२८ कामगारांची नोंदणी झालेली आहे. या कामगारांना सात वर्षांत कायद्यात तरतूद असूनही पेन्शन व घरासाठी कर्ज दिलेले नाही, तसेच निर्णय केलेल्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीसुद्धा केलेली नाही. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात अध्यक्ष शंकर पुजारी, विजय बचाटे, सुमन पुजारी, महेश लोहार, मारुती आजगेकर, देवीदास राठोड, आदींसह बांधकाम कामगार सहभागी झाले होते.अन्य मागण्यामहाराष्टÑातील नोंदीत कामगारांच्या ३१८ विधवांना किंवा त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये नुकसानभरपाई, अंत्यविधीसाठी १० हजार रुपये व दर महिन्याला २ हजार रुपये आर्थिक सहाय मागील सर्व फरकासह मिळावे.आतापर्यंत लाभार्थी कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्तीचे पेंडिंग अर्ज, प्रसूतीसंबंधीची मदत, मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याचे अर्ज व घरबांधणीसाठी केलेले पेंडिंग अर्ज त्वरित मंजूर करावेत.बांधकाम कल्याणकारी मंडळातील भ्रष्टाचारी कारभाराबद्दल ‘कॅग’ने दिलेल्या अहवालानुसार भ्रष्ट कामगार आयुक्तांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी.कोल्हापूर जिल्ह्यातील ३० हजार कामगारांना कल्याणकारी योजनांसाठी मिळणारे ३० कोटी रुपये त्वरित दिले जावेत.कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन देण्याचा निर्णय जाहीर करावा.