शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी निवडीच्या हालचाली गतिमान

By admin | Updated: July 23, 2016 00:54 IST

बाजार समिती : सभापतिपदासाठी सर्जेराव पाटील, संगीता पाटील यांची चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती बदलण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, निवडणुकीनंतर झालेल्या समझोत्यानुसार सभापतिपदाची संधी राष्ट्रवादी कॉँग्रेसला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून सर्जेराव पाटील-गवशीकर, संगीता पाटील यांची नावे चर्चेत असून, सभापतिपद राधानगरी तालुक्यात गेले तर उपसभापतिपदी राजे विक्रमसिंह घाटगे गटाच्या आशालता पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. एक वर्षापूर्वी बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस-जनसुराज्य-सतेज पाटील गट-शेकाप यांच्या आघाडीने १९ पैकी १५ जागा जिंकत सत्ता कायम राखली. त्यानंतर झालेल्या समझोत्यानुसार सभापतिपद जनसुराज्य व राष्ट्रवादीला दोन-दोन वर्षे, तर एक वर्षे सतेज पाटील यांच्या गटाला देण्याचे ठरले आहे. पहिल्या वर्षी जनसुराज्य पक्षाचे परशराम खुडे सभापती, तर सतेज पाटील गटाचे विलास साठे उपसभापती झाले. उपसभापतिपदासाठी राजे गटाच्या आशालता पाटील यांना संधी दिली जाणार होती; पण सतेज पाटील यांनी आग्रह धरल्याने त्यांचे नाव मागे पडले. ६ आॅगस्टला या पदाधिकाऱ्यांचा वर्षाचा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने नवीन निवडीसाठी संचालकांच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. सभापतिपदासाठी ए. वाय. पाटील यांचे समर्थक सर्जेराव पाटील, संगीता पाटील यांची नावे चर्चेत आहेत. सभापतीवर उपसभापतीची निवड अवलंबून राहणार असून, जर सर्जेराव पाटील यांना संधी मिळाली तर आशालता पाटील यांची उपसभापतिपदी वर्णी निश्चित लागू शकते; पण पहिल्या टप्प्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये सभापतिपद घ्यायचे ठरविले तर कृष्णात पाटील यांना संधी मिळू शकते. त्यावेळी उपसभापतिपदी ‘शेकाप’चे अमित कांबळे किंवा मानसिंगराव गायकवाड यांचे समर्थक शेखर येडगे यांची वर्णी लागू शकते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी १५ दिवस राहिल्याने इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.सलग सभापतीसाठी ‘जनसुराज्य’चा आग्रह?पाच वर्षांत दोन वर्षे ‘जनसुराज्य’ला सभापतिपद मिळणार आहे. त्यामुळे सलग दोन वर्षे सभापतिपद घेण्याचा ‘जनसुराज्य’चा आग्रह असू शकतो. मागील पाच वर्षांत दत्तात्रय साळोखे यांना पहिली दोन वर्षे संधी दिली. तसे झाले तर विनय कोरे हे खुडे यांना पुढे चाल देणार की बाबा लाड यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.