शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘थेट पाईपलाईन’ला गती

By admin | Updated: February 2, 2015 00:23 IST

४८८ कोटींची योजना : पुईखडी परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

गणेश शिंदे -कोल्हापूर - काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या कामास सुरुवात झाली असून, कामाची गती पाहता आगामी दीड-दोन वर्षांत कोल्हापूरकरांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पाईपलाईनच्या कामास पुईखडी येथून सुरुवात झाली आहे.  -गेल्या २० वर्षांत शहराचा विस्तार वाढल्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याचा तुटवडा पडू लागला आहे. जिल्ह्णातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्कालीन कांँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत थेट पाईपलाईनची योजना मार्गी लावली नाही तर पुढील निवडणूक लढविणार नाही, अशी गर्जना केली होती. दरम्यान, महापालिकेने या योजनेसाठी निविदा काढल्या. या योजनेचा ठेका हैदराबाद येथील जी. के.सी. कंपनीला दिला. पुईखडी येथे जेसीबीने खोदकाम करून जलवाहिनी जोडणी सुरू आहे. आजपर्यंत राज्य व केंद्र शासनाने एकूण ४८८ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चापैकी दोघांनी प्रत्येकी ५० टक्के रक्कम महापालिका प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे हे काम सुरू झाले आहे.करवीर तहसीलदारांनी मंजुरीचे पत्र दिल्यानंतर पुईखडी येथे कामास सुरुवात झाली, पण जलवाहिनी टाकण्यासाठी (उदा. रस्त्याकडील भाग, विद्युत खांब, अंतर्गत वाहिन्या, वृक्षतोड) पीडब्ल्यूडी व वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीनंतर पुढील काम सुरू होणार आहे. योजनेच्या कामासाठी संबंधित कंपनीला २७ महिन्यांचा कालावधी दिल्यामुळे ही योजना २०१७ ला पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे.सध्याच्या जलवाहिनीमधून २०३० सालचा विचार करता शहराला १८० दशलक्ष मीटर पाणी मिळणार आहे. २०४५ सालापर्यंतची लोकसंख्येनुसार २३८ दशलक्ष मीटर जलविसर्गासाठी अद्ययावत ‘स्पायरल वेल्डेड’ पद्धतीची जलवाहिनी वापरण्यात आली आहे.थेट पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध विभागांच्या मंजुरीसाठी महापालिका प्रशासन पाठपुरावा करीत आहे.- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महापालिका