शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

विशेष मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात १५ हजार नवमतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मतदारांचा टक्का कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्चला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम घेण्यात आली.

ठळक मुद्देविशेष मोहिमेत १५ हजार नवमतदार वाढलेपंधरा दिवसांत नावे मतदार यादीत समाविष्ट होणार

प्रवीण देसाईकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मतदारांचा टक्का कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्चला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम घेण्यात आली.

यामध्ये १५ हजार ७२६ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यामुळे सरासरी १५ हजार नवमतदार वाढणार असून, येत्या १५ दिवसांत ही नावे मतदारयादीत समाविष्ट होणार आहेत.जास्तीत जास्त मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे; यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

डिसेंबरअखेर झालेल्या नोंदणीमध्ये जवळपास सव्वालाख मतदार वाढले. यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या ३० लाख ७५ हजारांवर पोहोचली. ३१ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदारयादीचा हा आकडा आहे. त्यानंतरही आयोगाच्या निर्देशानुसार निरंतर मतदार नोंदणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

यात नाव नोंदणीसह, नावातील दुरुस्ती, स्थलांतर, वगळणी असे विविध अर्ज भरून घेण्यात आले. २३ व २४ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या मोहिमेत ९०६६ इतके मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महिलांचे ४४७१ व पुरुषांच्या ४५९५ अर्जांचा समावेश आहे. तसेच नावे वगळणीचे २६७१, नावातील दुरुस्तीचे १३४५, तसेच स्थलांतरचे ३९० अर्ज प्राप्त झाले.त्याचबरोबर २ व ३ मार्चला घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ६६६० मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महिलांचे ३३७९ व पुरुषांचे ३२८१ अर्ज आहेत. तर नाव वगळणीचे २८७०, नावातील दुरुस्तीचे १२७२ व स्थलांतराचे १५२ अर्ज प्राप्त झाले.

जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून त्याचे पुरावे तपासून मतदारयादीत ही नावे समाविष्ट केली जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.मोहिमेतील संभाव्य वाढलेले मतदारविधानसभा मतदारसंघ           पुरुष मतदार          महिला मतदार

  • चंदगड                                       ५०१                         ५२४
  • राधानगरी                                  ३९३                         ४४३
  • कागल                                        ८३८                        ९१३
  • कोल्हापूर दक्षिण                      १३३३                      १२८८
  • करवीर                                     ११०५                       १०१५
  • कोल्हापूर उत्तर                          ८३४                         ८९१
  • शाहूवाडी                                      ५९३                        ५०९
  • हातकणंगले                                 ७९४                        ८३४
  • इचलकरंजी                                  ६६९                       ७३४
  • शिरोळ                                         ८१६                       ६९९

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेतील मतदार नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची शहानिशा करून यातील नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.- सतीश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९kolhapurकोल्हापूर