शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरसाठी विशेष कृती आराखडाच हवा

By admin | Updated: February 29, 2016 01:08 IST

शहरवासीयांची मागणी : राजकीय इच्छाशक्तीची गरज ; रूपडे पालटण्यासाठी ५० कोटींची गरज

कोल्हापूर : कालबाह्य झालेली यंत्रसामग्री, व्हेंटिलेटरची कमतरता आणि वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे अपुऱ्या पडत असलेल्या बेडमुळे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) रूपडे पालटण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा राज्य सरकारने विशेष कृती आराखडा करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सीपीआर अधिक सक्षम होण्यासाठी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.‘गरिबांचे आधारवड व जिल्ह्याची आरोग्यवाहिनी’ असलेल्या सीपीआरमध्ये रोज कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यामधून रुग्ण येतात. विशेषत : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी माजी आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या काळात या रुग्णालयात यंत्रसामग्री आल्या. रुग्णालयात सध्या १३ व्हेंटिलेटरपैकी तीन सुरू व डायलेसिस मशीन बंदमुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. त्याचबरोबर कालबाह्य झालेल्या काही यंत्रसामग्री, त्या यंत्रसामग्रीवर होणारा दुरुस्तीचा खर्च व अतिदक्षता विभागामधील बेडची अपुरी संख्या अशा समस्या आहेत. राज्य शासनाने सीटी स्कॅनसाठी सुमारे सहा कोटी रुपये मंजूर केले; पण अद्यापही सीपीआरमध्ये सीटी स्कॅन मशीन आलेले नाही. सीटी स्कॅनच्या प्रतीक्षेत शहरवासीय आहेत. हे मशीन मे-जूनपर्यंत येईल,असे सांगितले जाते. रुग्णांना दिलासा...सीपीआरमध्ये यापूर्वी हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी अ‍ॅन्जिओग्राफी करण्यासाठी सहा हजार रुपये द्यावे लागत होते. मात्र, खासगी रुग्णालयात याचा दर तीन हजार रुपये होता. दोन महिन्यांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तीन हजार रुपये दर करून एकप्रकारे सर्वसामान्यांना दिलासा दिला.भविष्याचा विचार करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे विशेष कृती आराखड्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. जेणेकरून, रुग्णांना सर्व सुविधा मिळतील.- वसंतराव मुळीक, निमंत्रक, सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समिती, कोल्हापूर.