शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

‘स्वाभिमानी’साठी मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगावा

By admin | Updated: January 26, 2017 00:58 IST

जिल्हा परिषद निवडणूक : भाजपने लावली जोडणी : शिवसेनेलाही घेतले अंगावर, शेट्टी काँग्रेससोबत गेल्यास भाजप अडचणीत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसशी हातमिळवणी करून भाजपला सत्तेपासून रोखण्याची मोर्चेबांधणी सुरू केल्याने खडबडून जागा झालेल्या भाजपने बुधवारी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खासदार राजू शेट्टी यांना फोन करून ‘आघाडीचा विषय फार ताणवू नका,’ असे सांगावे अशा हालचाली सुरू झाल्या आहेत; परंतु स्वाभिमानी संघटना आता एवढी पुढे गेली आहे की त्यांना भाजपबरोबर जाणे शक्य नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, शिवसेनेचीही स्थिती सध्या अशीच असून संपर्क नेते अरुण दूधवडकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बुधवारी केलेली बोचरी टीका पाहता शिवसेनाही भाजपपासून चार हात लांब गेल्याचे मानण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत जर हे दोन पक्ष विरोधात लढले तर कोल्हापुरातही ही आघाडी होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. शिवसेना-भाजप या युतीची महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रवेशानंतर महाआघाडी बनली. संघटनेने भाजपला ‘विश्वासार्ह मित्रपक्ष’ मानून लोकसभा व विधानसभा त्यांच्यासोबत लढविली; परंतु ताकद वाढल्यानंतर भाजपकडून संघटनेला बेदखल करण्यात येऊ लागले. जिल्हा परिषदेच्या राजकारणातही त्याचीच पुनरावृत्ती घडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक हे आपल्यासोबत आहेत म्हटल्यावर फारशी कुणाची फिकीर केलेली नाही. संघटनेला त्याचा राग आहे. आम्ही मित्रपक्ष असतानाही आम्हाला साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही आणि परस्पर आघाडीचे जागावाटप जाहीर केले गेल्याने संघटनाही आक्रमक झाली. खासदार शेट्टी यांनी हातकणंगले तालुक्यात पारंपरिक विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तिथे शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकरही या आघाडीसोबत आहेत. शेट्टी काँग्रेसच्या सोबत गेले तर ते अडचणीचे ठरू शकेल, असे वाटल्याने मग अचानक बुधवारपासून संघटनेशी वाटाघाटी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर व जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्याशी संपर्क साधला व चर्चा करूया, म्हणून निमंत्रण दिले; परंतु त्यांनी हा विषय आता माझ्या पातळीवर राहिला नसून तुम्ही खासदार शेट्टी यांच्याशीच बोलावे, असे सुचविले परंतु त्यांच्याशी बोलायचे कुणी, याचे कोडे सुटेना म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनीच शेट्टी यांच्याशी बोलून आघाडीबाबतचा विषय संपवावा, असे ठरल्याचे समजते. (प्रतिनिधी)महाडिक यांचीही नाराजी..स्वाभिमानी संघटनेला फाट्यावर मारण्याची भाजपची भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाही आवडलेली नाही. त्यांनीही याबाबत चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून संघटनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सुचविल्याचे समजते.सांगलीतही आघाडी..खासदार शेट्टी यांनी सांगलीचे काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांच्याशी मंगळवारी आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. तिथेही संघटना व काँग्रेस एकत्रित लढण्याची चिन्हे आहेत.