शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सॉक्समध्ये स्टड अडकले अन् वादावादी झाली

By admin | Updated: January 9, 2015 00:27 IST

बालगोपाल आणि प्रॅक्टिस, बालगोपाल आणि शिवाजी असे सामने त्याकाळी फार रंगत होते.

सत्तरीच्या दशकात आमचा एका स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबबरोबर सामना सुरू होता. सामन्यादरम्यान माझ्या बुटाचे स्टड ‘प्रॅक्टिस’च्या दिलीप वायचळच्या सॉक्समध्ये अडकले. दिलीपला वाटले, मी त्याला लाथ मारतोय; त्यामुळे सामन्यात आमच्यात जोरदार वादावादी झाली अन् आम्ही एकमेकांच्या अंगावर धावून गेलो... असा किस्सा ‘बालगोपाल’चे माजी फुटबॉलपटू प्रकाश मंडलिक सांगत होते. बालगोपाल आणि प्रॅक्टिस, बालगोपाल आणि शिवाजी असे सामने त्याकाळी फार रंगत होते. त्यांत असाच एक सामना शाहू स्टेडियमवर सुरू होता. त्यात मी बचावफळी सांभाळत असल्याने साहजिकच येईल तो चेंडू परतावून लावणे हे माझे कर्तव्यच होते. माझा जवळचा मित्र दिलीप वायचळ प्रॅक्टिसकडून आघाडीवर खेळत होता. खेळताना माझ्या पायातील बुटाचे स्टड त्याच्या पायमोजात अडकले. त्याला वाटले मी लाथ मारतोय; त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात जोरदार वादावादी झाली आणि एकमेकांच्या अंगावर धावूनही गेलो; पण हा प्रसंग आम्ही येथेच विसरलो. सामना संपल्यानंतर आम्ही पुन्हा मैदानाबाहेर मिरजकर तिकटीला नेहमीप्रमाणे भेटलो. आमच्या मैत्रीवर या वादाचा कोणताच परिणाम झाला नाही.माझे वडील बाळकृष्ण मंडलिक हे बालगोपाल तालीम मंडळ फुटबॉल संघाचे संस्थापक होते. त्यांनी बाराईमाम तालीम मंडळाचा संघ फोडून ‘बालगोपाल’चा नवा संघ तयार केला. त्यामुळे मला त्यांच्यापासून फुटबॉलची आवड निर्माण झाली. पुढे मी गोखले कॉलेजकडून झोनल, आंतरविद्यापीठ, आंतरमहाविद्यालयीन, आदी स्पर्धा खेळलो. या स्पर्धांमध्ये साताऱ्याच्या एका संघाबरोबर आम्ही २४ गोल केले होते. यात दिलीप कोठावळे, अजित यादव यांनी हे गोल केले होते. मला प्रभाकर मगदूम, नारायण पिसे, विनोद केलान, दिलीप कोठावळे, बाबू घाटगे, बाजीराव मंडलिक, दत्तात्रय मंडलिक, दिलीप वायचळ, सुभाष सरनाईक, आदींबरोबर खेळण्यास मिळाले. बालगोपाल संघाने यादरम्यान कोल्हापुरात प्रथमच ‘वॉर्म अप’ करण्याचा प्रकार अवलंबला. आजचे खेळाडू सामन्यात तत्काळ जागा बदलत नसल्याने खेळात तोचतोचपणा येत आहे; त्यामुळे स्कोअर करण्यात ही मुले कमी पडत आहेत. यांनी घडविलाकोल्हापूरचा फुटबॉल...