शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

दक्षिण भारत जैन सभेचे अधिवेशन

By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST

शनिवारी प्रारंभ : गुणवंतांचा होणार सन्मान

कोल्हापूर : येथील दक्षिण भारत जैन सभेचे ९४ वे त्रैवार्षिक अधिवेशन २० व २१ डिसेंबरला कोल्हापुरातील शाहू सांस्कृतितक मंदिरमध्ये होत असून, त्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक येथून सुमारे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन प्रा. डी. ए. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितली. अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि.२०) सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते व महापौर तृप्ती माळवी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी धर्म ध्वजारोहण, स्वर्गीय शांतिनाथ पाटणे नगरचे उद्घाटन व डॉ. विलास संगवे व्यासपीठाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रानंतर दक्षिण भारत महिला परिषद, वीर महिला मंडळ मध्यवर्ती समिती अधिवेशन तर दुपारच्या सत्रात पदवीधर संघटना अधिवेशन, वीर सेवादल मध्यवर्ती समिती अधिवेशन होणार आहे. सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.रविवारी दुपारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते तसेच दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब आ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रा. साधना झाडबुके, अ‍ॅड. गोविंद पानसरे,डॉ. जयकुमार उपाध्ये, मीना गरिबे, प्रा. धरणेंद्र कुरकुरी, वसंतराव चौगुले नागरी पतसंस्था, अजितकुमार भंडे, ‘सकाळ’चे संपादक श्रीराम पवार, श्रीधर मेक्कळके , डॉ. सुनीलकुमार लव्हटे, सुधा नेजे, पंडित सुशीलकुमार उपाध्ये, माजी आमदार शरद पाटील आदी मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सागर चौगुले, प्रा. ए. ए. मुडलगी, जीवधर चौगुले, संजय शेटे, सुकुमार पाटील,सुरेश रोटे, राजू शेरवी, शीतल पाटील, राजेंद्र झेले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)