शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

‘सौ’नीही पदर खोवला!

By admin | Updated: October 10, 2014 00:16 IST

सांभाळली प्रचाराची धुरा : वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभा, पदयात्रांत सहभाग

इंदुमती गणेश - कोल्हापूर - विधासभेच्या रणांगणात उडी घेतलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या सौभाग्यवती त्यांच्या सारथी बनत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने ज्या परिसरात अद्याप उमेदवार पोहोचू शकले नाहीत, त्या-त्या परिसराला प्राधान्य देत या सौभाग्यवतींनी प्रचारात सरशी घेतली आहे. ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार सतेज पाटील यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांनी गेल्या आठ-दहा वर्षांपासून ‘गृहिणी महोत्सवा’च्या माध्यमातून महिलांचे संघटन केले आहे. प्रचारसभा, मेळावे, दौरे या माध्यमातून त्या आमदार पाटील यांच्या कामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. त्याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक या कागलचे घाटगे सरकार मृगेंद्रराजे घाटगे यांच्या कन्या. अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी त्या प्रत्येक गावात छोट्या-मोठ्या सभा घेत आहेत. ‘कोल्हापूर उत्तर’चे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली या कोल्हापुरातून तीनवेळा नगरसेवक पद भूषविलेल्या बापूसाहेब मोहिते यांच्या कन्या. माहेरी अगदी आजी-आजोबांपासूनच राजकीय पार्श्वभूमी आहे. भगिनी मंच आणि महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे केलेले संघटन ही त्यांची जमेची बाजू. अगदी घरोघरी जाऊन त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. भाजपचे उमेदवार महेश जाधव यांच्या पत्नी आरती यादेखील शहरात फिरून मतदारांना जाधव यांनाच मत द्या, असे आवाहन करीत आहेत. करवीर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांनीदेखील पतीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे. हळदी-कुंकू, महिला मेळावे, सभा यांसह दारोदारी जाऊन त्या आमदार नरके यांच्या कामांची माहिती देत आहेत. इचलकरंजी मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले प्रकाश आवाडे यांच्या पत्नी किशोरी आवाडे या स्वत: साडेसात वर्षे इचलकरंजीच्या नगराध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहेच, शिवाय या काळात त्यांनी शहरात केलेली विकासकामे मतदारांना माहीत आहेत. त्यांनी महिला मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले असून हळदी-कुंकू, बैठका, पदयात्रेच्या माध्यमातून त्या प्रकाश आवाडे यांचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. माजी आमदार संजयबाबा घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पत्नी अरुंधती घाटगे या मूळच्या मुंबईच्या. माहेरी कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसतानाही या कोल्हापूरच्या सूनबाई राजकारणात सक्रिय आहेत. सध्या त्या ‘गोकुळ’च्या संचालिका आहेत. कोल्हापूर उत्तरमधून कम्युनिस्ट पक्षाचे रघू कांबळे हे निवडणूक लढवत आहेत. वंचितांसाठी आणि ‘रस्त्यावर येऊन लढणारा कार्यकर्ता’ अशीच ओळख असलेल्या कांबळे यांच्या पत्नी शोभना यांनीदेखील त्यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे.अर्धांगिनीच्या रूपाने भक्कम पाठिंबाविधासभेच्या रणांगणात पाऊल टाकलेल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी त्यांच्या अर्धांगिनीच्या रूपाने भक्कम पाठिंबा मिळाला आहे. मतदारांचे मन वळविण्यात आणि धक्कादायक निकाल लागण्यात महिलांची मते निर्णायक ठरतात हे लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झाल्याने सर्वच उमेदवारांनी महिला मतदारांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी सौभाग्यवती त्यांना साथ देत आहेत.