शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पक्षकाराच्या मालमत्तेत हिस्सा मागितला; ॲड. रणजीतसिंह घाटगेची पाच वर्षांसाठी सनद रद्द

By उद्धव गोडसे | Updated: October 17, 2023 14:39 IST

बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीचा निर्णय

कोल्हापूर : पक्षकार महिलेचा खटला चालवण्यासाठी ११ लाख रुपयांचे शुल्क घेऊन, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा देण्याचे लिहून घेतल्याबद्दल ॲड. रणजीतसिंह सुरेशराव घाटगे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांची सनद पाच पर्षांसाठी रद्द झाली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली. असा प्रकारची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजी येथील एका महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर सासरच्या नातेवाईकांनी तिचा मालमत्तेवर अधिकार नाकारला. त्यानंतर संबंधित महिलेने ॲड. घाटगे यांच्याकरवी न्यायालयात दावा दाखल केला. खटला लढवण्यासाठी दोन कोटी रुपये फी देण्याचे ठरले होते. यातील ११ लाख रुपये ॲड. घाटगे यांना पोहोचले होते. उर्वरित रकमेसाठी मालमत्तेतील ३३ टक्के हिस्सा देण्याचे वकिलांनी महिलेकडून लिहून घेतले. शिवाय योग्य पद्धतीने खटला लढवला नाही. याबाबत पक्षकार महिलेने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली. कौन्सिलचे शिस्तपालन समितीचे सदस्य ॲड. आशिष देशमुख यांनी चौकशी करून ॲड. घाटगे यांना सकृतदर्शनी दोषी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही तक्रार तीन सदस्यीय समितीकडे वर्ग केली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेऊन समितीने ॲड. घाटगे यांची सनद पाच वर्षांसाठी रद्द केली. तसेच व्याजासहित १४ लाख रुपये तक्रारदार महिलेस परत देण्याचा निर्णय दिला. दंडाची रक्कम अदा न केल्यास तहहयात सनद रद्द होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरadvocateवकिल