शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सोपानराव नि मुख्यमंत्री - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

मा. मंत्री साेपानराव यांचा भाव अकल्पितपणे वधारला. प्रसन्नता वाढली. मंत्रीजी जसे सुखावले तसे सचिव पांडेजी अन् पक्षातील इतर समर्थकांच्या ...

मा. मंत्री साेपानराव यांचा भाव अकल्पितपणे वधारला. प्रसन्नता वाढली. मंत्रीजी जसे सुखावले तसे सचिव पांडेजी अन् पक्षातील इतर समर्थकांच्या आनंदालाही पारावार उरला नाही.

काही काळ सुखेनैव पार पडला. परंतु, काही दिवसांनंतर मंत्रीजी पुनश्च मागच्यासारखे चिंताक्रांत अन् उदास राहू लागले. अचानक त्यांच्या वृत्तीत व वागणुकीत असा अचानक फरक का पडला असावा? याविषयी शंका-कुशंका व्यक्त हाेऊ लागल्या.

पांडेजींच्या लक्षात जेव्हा ही बाब आली, तेव्हा तेही विचारात पडले. कदाचित विराेधकांनी आरक्षणासंबंधात शासनाला दिलेल्या इशाऱ्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली असेल. कारण विराेधकांच्या मते सरकार या प्रकरणात टाळाटाळ करत असल्याने यापुढे सर्व मंत्र्यांना राज्यात कुठेही फिरू दिले जाणार नाही.

आगामी वर्षात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने प्रचारासाठी मंत्र्यांना राज्यभर फिरणे अशक्य हाेईल; याची धास्तीतर मंत्री साेपानराव यांना वाटत असेल? पांडेजींचे विचार चक्र सुरू झाले.

यात नवीन भर अशी पडली की मंत्रीजींच्या मतदार संघातील किसान संघटनेच्या वरिष्ठ नेत्याने शासनाला थेट धमकी दिली आहे की, ‘या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सरकारने पूरग्रस्तांना त्वरित सहाय्य न केल्यास ते नेताजी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह जलसमाधी घेतील!’

मंत्री साेपानराव अन् त्यांच्या मतदारसंघातील ‘ताे किसान नेता यांच्यात काहीतरी ‘जुमला’ असावा! अशी शंका (?) कॅबिनेट मंत्री काैतिकराव यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण...

या सगळ्या ईष्टानिष्ठ शंकांच्या जंजाळातून सचिव पांडेजींच्या हाती काही ठाेस निष्कर्ष आला नाही. शेवटी त्यांनी मंत्रीजींची पुन्हा भेट घेऊन त्यांना विचारले, ‘सर! काय झालं आहे? प्रकृती तर बरी आहे ना?’

काळजीयुक्त स्वरात मंत्रीजी म्हणाले, ‘प्रकृती वगैरे ठीक आहे, पण मला क्षणभरही चैन लाभत नाही.’

‘मग कॅबिनेट मंत्री काैतिकराव यांनी तुमच्या विरुद्ध मा. मुख्यमंत्र्यांकडे काही कागाळी तर केली नाही!’ पांडे यांनी काहीसा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

‘अरे नाही, ‘त्यांची’ काय ‘औकात’ आहे की, माझ्या केसालाही धक्का लावण्याचे धाडस करतील?’ एकदम उत्तेजित झालेल्या मंत्री साेपानराव यांनी आपल्या चिंताग्रस्त मन:स्थितीचा खुलासा करताना सांगितले की, ‘हे पहा पाण्डे, तुम्ही सांगितलेल्या युक्तीनुसार, आतासुद्धा माेठ्या संख्येने आमच्याकडे लाेक येतच आहेत. परंतु, परवा ‘कर्मचारी प्रहार संघटनेचा अध्यक्ष सुभानराव काटे आमच्याकडे आला हाेता. त्यांनी एक पत्रक आम्हाला दिले, अन कर्मचाऱ्यावरील अन्यायांचा आम्ही तीव्र निषेध करताे. आठवडाभरात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमचे सर्व कार्यकर्ते सचिवालयासमाेर प्राणांतिक उपाेषणास बसणार आहाेत!’ अशी धमकी पण दिली. अन् तेव्हापासून आमची चिंता वाढली आहे.’

‘सर! आपण मुळीच काळजी करू नका! ही सुद्धा अगदी क्षुल्लक बाब आहे. उद्या सकाळपर्यंत मी यावर ‘ताेडगा’ सुचविताे. आपण मात्र निर्धास्त रहा.’

‘सर, आपणास एक याेजना सुचविताे. आपण यावर जरुर विचार करा.’ सचिव पांडे.

‘मागे आपण ज्या कर्मचाऱ्यांना ‘सस्पेंड’ केले हाेते, त्या सर्वांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश काढा, अन् सध्या जे कामावर असतील त्यांना नाेकरीवरून काढून टाकण्यात येत असल्याचे ‘फर्मान’ काढा. मग पहा! कशी कमाल हाेते ते!’

मंत्री साेपानराव यांनी क्षणभर विचार करून पांडे यांनी सुचविलेल्या याेजनेस संमती दिली. सध्या सुद्धा जे कर्मचारी मंत्रीजींकडे येत हाेते, त्यांची संख्यादेखील कमी झालेली नाही. आता रे ‘रिकाम्या’ हाताने येत नाहीत.

नव्या यंत्रणेची अंमलबजावणी सुरू झाली हा ‘हंगाम’सुद्धा तेजीत जाणार याची खात्री झाल्याने मा. मंत्री साेपानराव अन् सचिव पांडेजी सुखावले व निर्धास्त झाले हाेते.

परंतु, मंत्री महाेदयांच्या स्वप्नांना लवकरच ‘ग्रहण’ लागणार अशी चिन्हं उमटू लागली. त्यांच्या भरभराटीच्या ‘अश्व’ राेखण्यासाठी पक्षातील अन् प्रत्यक्ष त्यांच्याच गाेटातील अनेक विराेधक पुढे सरसावले. मंत्रीजींच्या स्व-पक्षात सुद्धा एक-दुसऱ्याचे पाय ओढण्याची परंपरा जुनीच आहे.

मंत्री साेपानराव यांच्या नवीन कार्यकलापामुळे विभागीय नाेकरवर्गात असंताेष वाढत गेला. विराेधी पक्षानेसुद्धा या संधीचा फायदा उठविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या अनुषंगाने आंदाेलन, हरताळ, माेर्चे काढण्यात आले. या विराेधाला ताेंड देण्यासाठी मंत्रीजीही सज्ज झाले.

विधानसभेचे अधिवेशन सत्र संपताच मा. मंत्री साेपानराव स्वत:च्या मतदारसंघात परतले. येताच त्यांनी निजी सचिव गुरुदास पांडे यांच्या सल्ल्यानुसार ‘मंत्री साेपानराव जन सक्षमीकरण मंचाची’ तातडीने स्थापना केली. हे नामकरणसुद्धा त्यांनाही खूप आवडले.

मा. मंत्री महाेदयांचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांच्या मनावर ठसावे, यासाठी सचिव पांडे यांनी मुंबईतील मास्टर साेमनाथ या नामवंत कलाकाराला पाचारण केले. मंचाच्यावतीने मंत्री साेपानराव अन् मा. मुख्यमंत्री या उभयतांचे छायाचित्र असलेले आकर्षक नि प्रभावी पाेस्टर तयार करण्याची कामगिरी साेमनाथजीवर साेपविण्यात आली. त्यांनीसुद्धा आपली कलाकुसर यथार्थपणे वापरून हजाराे आकर्षक पाेस्टर्स मंत्रीजींना सादर केले, इतकेच नव्हे तर आपल्या कामगार-संचाच्या मदतीने राताेरात ते पाेस्टर्स मा. मंत्री साेपानराव यांच्या मतदार क्षेत्रात सर्वत्र झळकाविलेही.