शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

काही जणांकडेच ‘सामाजिक न्याय’चा निधी : चंद्रकांत पाटील

By admin | Updated: May 24, 2017 16:06 IST

शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक प्रदान, समाजउत्थान पुरस्कारांचे कोल्हापूरात वितरण

आॅनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 24 - ‘सामाजिक न्याय’विभागाला घटनेच्या आधारे मोठा निधी मिळतो. तो सर्वसामान्यांपर्यंत जावा अशी अपेक्षा आहे. मात्र तो काहीजणांकडेच फिरतोय. म्हणूनच ज्यांनी योजनांचा याआधी लाभ घेतला आहे त्यांनी इतरांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारांचे वितरण बुधवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सहा संस्थांना आणि १२५ जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले, समाजातील स्थिती पाहता आम्ही जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तेव्हा आमच्या हयातीत परिवर्तन होईल असे वाटत नव्हते. मात्र आता चांगली नोकरी, लठ्ठ पगार सोडून अनेकजण इतरांच्या विकासासाठी काम करताना दिसत आहे. अनेक व्यक्ति आणि संस्था त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. त्यामुळे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. हातकणंगले तालुक्यातील माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे जाहीर केले. तेथे स्मारक उभारण्यात येत असून सध्या मंजूर झालेले दोन कोटी रूपये खर्च झाल्यानंतर पुन्हा निधी देऊ.सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी शाहू, फुले, आंबडेकर यांनी प्रयत्न केले. हाच विकासाच्या विचाराचा धागा पकडून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने काम सुरू आहे. आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर असो, इंदू मिलचे स्मारक असो ही कामे मार्गी लावली असतानाच आंबेडकरांचे जेथे जेथे वास्तव्य होते ती ठिकाणे विकसित करण्याचे धोरण आमच्या विभागाने आखले आहे. सामाजिक न्याय खात्याचे राजयमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राजयातील दीन, दलित, शोषित, पीडीत समाजाला न्याय देण्याचे काम आमच्या विभागातर्फे सुरू आहे. पूर्वी कमी संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जावेत म्हणून त््यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र आम्ही किमान १२५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी ७५ मुले मुली शिक्षणासाठी परदेशात गेली. आजच्या पुरस्कार विजेत्यांनी समाज आणि शासन यांच्यामधील दुवा व्हावे. या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. तर समाजकल्याण आयुक्तक पियूष सिंह यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापौर हसीना फरास, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, माजी राजयमंत्री भरमूआण्णा पाटील, उत्तम कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्तक सदानंद पाटील, प्रादेशिक उपायुक्त रविंद्र कदम पाटील, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, विशेष अधिकारी विशाल लोंढे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्त्यांनी ‘आई बाबां’ची भूमिका स्वीकारावीनेमक्या भाषेत मांडणी करताना चंद्रकांतदादा म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता ‘आई बाबां’ ची भूमिका स्वीकारावी. आई जया पध्दतीने कणव बाळगते. त्या भूमिकेतून आपल्या हातातील योजना गरजंूपर्यंत पोहोचलीच पाहिजे असा ध्यास कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे. तर वडील जया पध्दतीने कठोर होतात तसे गैरप्रकार करणाऱ्यांंसाठी काठीही हातात घेतली पाहिजे. एकदा फायदा घेतल्यानंतर दुसऱ्यासाठी प्रयत्न करामाझे नीट चालले आहे, तर मी पुन्हा आरक्षणाचा लाभ घेणार नाही, माझी पत्नी सरकारी नोकर आहे तर मग मी पुन्हा घरकुलाच्या योजनेत नाव देणार नाही अशा पध्दतीने जयांनी या योजनांचा लाभ घेतला आहे त्यांनी आता पुन्हा पुन्हा आपण लाभ न घेता तो इतरांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लाभ घेणारी माणसे बाजुला झाल्यानंतरच खालच्या माणसांना लाभ होणार आहे याची जाणीव ठेवा अशा शब्दात मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्याना आवाहन केले. बालकलाकारांना दादांकडून रोख बक्षिसकार्यक्रम सुरू होण्याआधी रेहमान शकील नदाफ (कोल्हापूर) याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रभावी भाषण केले तर सांगलीच्या पृथ्वीराज गंधर्व याच्या महाराष्ट्र गीताने अंगावर रोमांच उभे केले. या दोघांनाही चंद्रकांतदादा पाटील यांनी वैयक्तिकरित्या रोख बक्षिस दिले. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उपस्थितांनीही या दोघांच्या सादरीकरणाला दाद दिली.