शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

परवानगी घेऊनच सोमय्या पुन्हा कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊनच भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री ...

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊनच भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी कराडच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर पुन्हा या हालचाली सुरू होतील असे सांगण्यात येते.

सोमय्या यांनी १३ सप्टेंबर २०२१ रोजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा पहिला आरोप केला. हा पैसा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे वळविल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर त्यांनी २० सप्टेंबरला कोल्हापूर जिल्हा दौऱ्याची घोषणा केली. घोरपडे कारखान्याची पाहणी आणि मुरगुड पोलूस स्टेशन, तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट व अन्य त्यांचे कार्यक्रम होते; परंतु त्यांना कोल्हापुरात येण्यापासून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी रोखले आणि महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराडमध्येच उतरविले.

आता पुन्हा सोमय्या कोल्हापूरला येणार आहेत; परंतु त्याआधी ते रीतसर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन येण्याच्या नियोजनात आहेत. एकतर ज्या पद्धतीने सोमय्या यांना विरोध झाला त्यातून सोमय्यांनाच अधिक प्रसिद्धी मिळाली असा सूर व्यक्त होत आहे. जर सोमय्या यांना विरोधच केला नसता तर ते येऊन कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन गेले असते. तशीच पत्रकार परिषद हसन मुश्रीफ समर्थकही घेऊ शकले असते; परंतु हातात ‘पायताण’ घेऊन विरोध केल्याने आणि मुंबईपासून सोमय्या यांना रोखण्यासाठी जी यंत्रणा लावण्यात आली त्याचे लाइव्ह चित्रण दाखविले गेल्याने प्रमाणापेक्षा सोमय्या यांच्यावर फोकस राहिला. जो त्यांना अपेक्षित होता.