शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

‘शिवनेरी’चा धुव्वा

By admin | Updated: December 17, 2014 00:15 IST

केएसए फुटबॉल लीग :‘पोलीस’ची पीटीएम ‘ब’वर मात

कोल्हापूर : शाहू स्टेडियमवर के.एस.ए. फुटबॉल लीग सामन्यात आज, मंगळवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने शिवनेरी स्पोर्टस्वर ३-० ने मात केली, तर कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघाने पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ वर २-१ ने मात केली. आज पहिला सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘बालगोपाल’कडून शॉर्टपासवर भर देत सामन्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. बालगोपालकडून झालेल्या चढाईमध्ये जयकुमार पाटीलच्या पासवर ऋतुराज पाटीलने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून गेल्याने त्याची साधी संधी हुकली. त्यापाठोपाठ ‘शिवनेरी’कडून झालेल्या चढाईमध्ये सूरज जाधवने मारलेला फटका बालगोपाल संघाचा गोलरक्षक अक्षय कुरणे यांनी पंच करून बाहेर काढला. बालगोपालच्या ऋतुराज पाटीलने २३ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात १-०ने आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत बालगोपाल तालीम मंडळ आघाडी होते. उत्तरार्धात बालगोपालने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या प्रारंभास बालगोपालकडून ऋतुराज पाटीलच्या पासवर श्रेयस मोरेने गोल नोंदवत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. ७२ व्या मिनिटाला बालगोपाल संघाच्या बबलू नाईकच्या पासवर ऋतुराज पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवत सामन्यात ३-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिल्याने बालगोपालने सामन्यात विजय मिळविला. दुसरा सामना कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ यांच्यामध्ये झाला. सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला ‘पोलीस’कडून अमोल चौगुलेने मैदानी गोल करत संघाचे खाते उघडले. पाठोपाठ झालेल्या चढाईमध्ये पोलीस संघाच्या खेळाडूला पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाच्या खेळाडूने अवैधरीत्या अडविल्याबद्दल पोलीस संघाला पेनल्टी देण्यात आली. यामध्ये सुनील घुमाईने अचूक गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत २-०ने आघाडी घेतली. उत्तरार्धात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’कडून रोहित नलवडे, संग्राम शिंदे, रोहन जाधव, सूरज हकिम, गणेश पाटील यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या चढाया फोल ठरल्या. सामना संपण्याच्या जादा वेळेत सूरज हकिमने गोल नोंदवत आघाडी कमी करण्याच प्रयत्न केला. मात्र, सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत ही पोलीस संघाची आघाडी कामय राहिल्याने पोलीस संघाने २-१ गोलफरकाने सामन्यात विजय मिळविला.