शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

महासभेच्या मान्यतेसाठी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव

By admin | Updated: July 18, 2015 00:20 IST

सोमवारी महासभा : शहर वाहतूक शाखेच्या जागेला मुहूर्त सापडला; रस्त्यावर मंडप परवानगीच्या प्रस्तावावर वादळी चर्चा शक्य

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश व्हावा, शहर पोलीस वाहतूक शाखेला प्रिन्स शिवाजी उद्यानाच्या पिछाडीस असलेली इमारत वापरासाठी देणे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सव काळात वाहतुकीस अडथळा होणार नाही अशाच मंडपांना परवानगी देण्याबाबत, मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याबाबत सोमवारी (दि. २०) होणाऱ्या सभेत हे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. उत्सव काळात मंडप उभारणीवर आलेल्या मर्यादेवरून सभागृहात वादंग होण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती व सदस्य सचिन चव्हाण व दिगंबर फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २३, २५ (९), ३० (५) नुसार या रिक्त जागी उर्वरित कालावधीसाठी प्रमाणशीर पद्धतीने नामनिर्देशाद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा आवळे यांचाही दाखला बोगसगिरीने रद्द झाला. त्या परिवहन समिती सदस्य व महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती होत्या. त्यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादीतर्फे दोन सदस्यांची निवड या सभेत केली जाणार आहे.याव्यतिरिक्त नर्सिंग होम व मॅटर्निटी होम,आदींच्या फायर अ‍ॅक्टमुळे रखडलेल्या व्यवसाय परवान्याबाबत सुधारित धोरणांवर सभागृहात चर्चा होणार आहे. शासन निर्णयानुसार नोंदणीकृत झोपडपट्टीतील बांधकामास परवानगी देणे, लोणार वसाहत येथील विस्थापितानंतर रिकामी झालेल्या जागेवर बगीचाचे आरक्षण टाकणे, ध्यानचंद हॉकी स्टेडियमला जोडणाऱ्या चौकास रेणुका मंदिर चौक, महावीर कॉलेज ते कलेक्टर आॅफिस या रस्त्यास ‘माजी खासदार शंकरराव माने पथ’ असे नाव देणे, हॉकी स्टेडियम चौकाचे ‘प्रभू विश्वकर्मा चौक’ नामकरण करणे, कसबा बावड्यातील चौघांना भुईभाड्याने जागा देणे, शहराच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या परिसरामध्ये ‘तावडे हॉटेल’ हे नाव वर्षानुवर्षे प्रचलित असून, ते कायम लक्षात राहण्यासाठी ‘तावडे हॉटेल चौक’ अशा नामकरणाचा प्रस्ताव, आदी ठराव सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.रमणमळा आरक्षित जागा खरेदी प्रकरणरमणमळा येथील आरक्षित जागा खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने मागील सभेत मागे घेतला. मात्र, सभागृहाची मंजुरी किंवा नामंजुरीशिवाय हा प्रस्ताव राज्यशासनास सादर केला आहे. यावरून प्रशासनास नगरसेवक जाब विचारण्याच्या तयारीत आहेत. या प्रश्नावर सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.