शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

कुर्डूच्या माळावर टँकरमधून मळी

By admin | Updated: February 7, 2015 01:04 IST

‘प्रदूषण नियंत्रण’ची माहिती : टँकर ‘भोगावती’च्या डिस्टिलरीचा असल्याचा संशय

कोल्हापूर : कुर्डू (ता. करवीर) जवळच्या माळावर मळीमिश्रीत रसायनाचा टँकर सोडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी निदर्शनास आले. हे टँकर भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून सोडल्याचा संशय आहे. ही डिस्टिलरी खासगी कंपनीतर्फे चालविण्यात येत आहे. गेल्यावेळेला सोडलेले पाणीही त्यांनीच सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.ट्रॅक्टरद्वारे हळदी परिसरात ओतलेले रसायनमिश्रीत पाणी भोगावती नदीत मिसळल्याने हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पाणी दूषित झाल्यामुळे गुरुवारी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाण्यावर मृत माशांचा खच लागला होता. मेलेले मासे गोळा करून नेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची झुंबड उडाली. गेल्या २२ डिसेंबरलाही असाच प्रकार झाला होता. मळीमिश्रित पाणी नक्की सोडले कुणी याचा शोध कालही लागला नव्हता म्हणून शुक्रवारी सकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर व पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी पुन्हा नदीकाठी जावून पाहणी केली. तेथून ते प्रदूषित पाण्याचा माग घेत चालत गेल्यावर हे पाणी कुर्डूजवळच्या माळावर सोडल्याचे लक्षात आले. ते पाणी शेतातून वाहून ओढ्यातून थेट भोगावती नदीत मिसळले. पाणी सोडलेल्या जागेपासून नदीपर्यंतचे अंतर साडेसातशे मीटर आहे. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली. मासे मरण्याचे ते महत्त्वाचे कारण असल्याचे पाहणीत आढळून आले. काल रसायनामुळे पाणी प्रदूषित झाल्याचे सांगण्यात येत होते परंतू आज तिथे मळीचा वास येत होता. त्यामुळे साखर कारखान्यातील मळीच सोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही मळी कोणी सोडली, त्याचे टँकर कुणाचे होते, याची माहिती ज्यांच्या शेतातून ही मळी वाहत आली, त्या शेतकऱ्यांना बोलावून घेतली जाणार असल्याचे डोके यांनी सांगितले. गेल्यावेळेला पाणी कशामुळे प्रदूषित झाले हे शेवटपर्यंत समजले नव्हते. आता त्याचे कारण स्पष्ट झाल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाल्याचे डोके यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अहवाल प्राप्त...गेल्या २२ डिसेंबरला जेव्हा असेच प्रदूषण झाले तेव्हा भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून तीन टँकर मळी बाहेर गेल्याची नोंद झाली होती परंतु ते टँकर कुठे गेले याचा शोध आतापर्यंत लागलेला नाही. त्यावेळी नदीचे प्रदूषण झाल्यावर कारखान्याच्याच काही संचालकांनी पाटबंधारे मंडळास कळवून नदीत पाणी सोडायला लावले. धरणातून नदीत पाणी सोडल्याने प्रदूषणाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे त्यावेळी पाणी प्रदूषित झाले नव्हते, असा अहवाल चिपळूण च्या प्रयोगशाळेतून आला असल्याचे डोके यांनी सांगितले.कुर्डूजवळच्या ओढ्यात मळीचा प्रचंड वास येत होता. त्याची छायाचित्रे घेतली आहेत. या पाण्याचे तीन ठिकाणचे नमुने घेतले आहेत. ते देखील तपासणीसाठी चिपळूणला पाठविण्यात येतील. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल. - एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर