कोल्हापूर : ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या ५६ व्या वरिष्ठ गट ‘भारत श्री’ स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या दुर्गाप्रसाद दासरी, अजिंक्य रेडेकर, योगीराज शिंगे, योेगेश पवार, ओमकार कापरे, दिग्विजय दबडे यांची निवड झाली. ही निवड कल्याण येथे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेतून करण्यात आली.दुर्गाप्रसादने ८५ किलो वजनगटात, तर इचलकरंजी जवाहर साखर कारखान्याचा अजिंक्य रेडेकरने ७५ किलोगटात सुवर्ण, तर योगीराज शिंगे याने रौप्यपदक पटकाविले. ‘वारणे’च्या योगेश पवारने सहावा क्रमांक मिळविला. याशिवाय ओंमकार कापरे व दिग्विजय दबडे अनुक्रमे द्वितीय व चौथा क्रमांक पटकाविला. या सहाजणांची निवड नोएडा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. या खेळाडूंना महाराष्ट्राचे सचिव संजय मोरे, बिभीषण पाटील, ‘भारत श्री’ उपविजेता विजय मोरे, प्रा. प्रशांत पाटील, नितीन भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूरच्या सहाजणांची‘भारत श्री’साठी निवड
By admin | Updated: March 17, 2016 00:27 IST