शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:13 IST

सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुकमंगळवार, बुधवार, रविवारी सेवा; तिकीट नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन

कोल्हापूर : सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे.धावपट्टीची दुरुस्ती, नागरी वाहतुकीचा परवाना, आदी कारणांमुळे गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या कोल्हापूरच्या विमानसेवा प्रारंभाचा दि. २२ एप्रिल हा मुर्हूत निश्चित झाला आहे. एअर डेक्कन कंपनीने रविवारी (दि. ८) घेतलेल्या विमान उड्डाणाच्या चाचणीमुळे या मुर्हूतावर शिक्कामोर्तब झाला.

‘उडान’ योजनेअंतर्गत ‘एअर डेक्कन’कडून कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि रविवारी पुरविली जाणार आहे. यासाठी १८ आसनी विमान आहे. यातील पहिल्या नऊ आसनांसाठी ‘उडान’ अंतर्गत १९७० रुपये तिकीट दर आहे. उर्वरीत जागांसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये तिकीट दर असणार आहे.

तिकीटाची नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन आहे. ‘एअर डेक्कन’च्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावयाची आहे. कोल्हापूरमधून मुंबईला टेकआॅफ करणाऱ्या पहिल्या विमानामध्ये बसण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यासाठी तिकीट नोंदणीकरिता चांगला प्रतिसाद आहे.

एअर डेक्कनने त्यांच्या संकेतस्थळावर कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची माहिती गेल्या चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर रविवारी एअर डेक्कनने विमान उड्डाणाची चाचणी घेतली. आणखी चार दिवस ही चाचणी केली जाणार आहे.

सांताक्रूझ टर्मिनसवर उतरणार विमानमुंबईतून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी सुटणारे विमान कोल्हापुरमध्ये २ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापुरातून ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबई येथे ४ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईमध्ये सांताक्रूझ विमानतळावरील टर्मिनस वन-ए येथे कोल्हापूरहून जाणारे विमान उतरणार आहे.

विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरचा एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोल्हापूरच्या पर्यटन, औद्योगिक, शिक्षण, कला-सांस्कृतिक आदी क्षेत्रातील विकासाला गती मिळणार आहे. मुंबई-कोल्हापूर प्रवासासाठीचा वेळ वाचणार आहे.-समीर शेठ, सदस्य,कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती

 

विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरला खूप फायदा होणार आहे. उद्योग-व्यवसाय, वैद्यकीय सेवा-सुविधा, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये विकासाची पाऊले निश्चितपणे पडणार आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या तिकीट नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद आहे.- बी. व्ही. वराडे, विभागीय व्यवस्थापक, ट्रेड विंग्ज् लिमिटेड

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर