शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांनंतर माकडाची दहशत; सहा जणांचा घेतला चावा

By भारत चव्हाण | Updated: March 8, 2024 18:49 IST

आठ तासांच्या थरारानंतर जवानांनी या माकडला जेरबंद केले

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असताना त्यात भरीस भर म्हणून गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस एका माकडाने बागलचौक, शाहुपुरी, टाकाळा परिसरात अनेकांचा चावा घेत दहशत माजविली. या संतापलेल्या माकडाला पकडण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली. आठ तासांच्या थरारानंतर जवानांनी या माकडला जेरबंद केले.गुरुवारी सायंकाळी बागल चौक येथील जयप्रकाश नारायण उद्यानात एक माकड आले. सुरवातीला त्याच्याकडे गम्मत म्हणून पाहात दुर्लक्ष केले. परंतू रात्री ते काही जणांच्या अंगावर धावून जायला लागले. राजारामपुरी परिसरात नागरिकांच्या अंगावर धावून येत होते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलास त्याची कल्पना दिली. रात्री एक वाहनासह काही जवान तेथे पोहचले. पण ते सापडले नाही. अंधारही पडल्याने त्याला पकडण्याची मोहिम थांबविण्यात आली.

शुक्रवारी सकाळी हे माकड साईक्स एक्स्टेशन परिसरात युवराज बालिगा यांना चावले. तसेच अन्य नागरिकांच्याही अंगावर धावून जायला लागले. त्यामुळे  अग्निशमन दलाला पुन्हा फोन करण्यात आला. यावेळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. वन विभाग कर्मचाऱ्यांनाही त्याठिकाणी बोलावून घेण्यात आले. परंतू  माकडाने साईक्स एक्स्टेश, टाकाळा परिसरात धुडगुस घालण्यास सुरवात केली. कधी झाडावर तर कधी इमारतींच्या टेरेसवर जाऊन  बसायला लागल्याने त्याला पकडने अवघड होऊन बसले. साडेचार वाजेपर्यंत माकड पुढे आणि जवान, कर्मचारी मागे असा थरार सुरु  होता. 

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला माकडाला अग्निशमन जवान व वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅंग्युलायझरचे गनचा आवाज व जाळीच्या साह्याने या माकडाला पकडले. यानंतर त्याला सुखरूप दाजीपूर अभयारण्यात सोडण्यासाठी नेण्यात आले. या मोहिमेत महानगरपालिका अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी जयवंत खोत वाहन चालक  नवनाथ साबळे फायरमन प्रमोद मोरे व संभाजी  ढेपले व वन विभागाचे अमोल चव्हाण, विनायक माळी, काटकर  प्रदीप सुतार- पथक प्रमुख बांगी, तसेच माजी उपमहापौर संजय मोहिते व इचलकरंजी वन्य जीव संरक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

पाच ते सहा जणांचा घेतला चावाहे माकड पिसळलेले होते, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसात त्याने पाच ते सहा नागरिकांचा चावा घेतला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMonkeyमाकड