शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

Kolhapur Politics: सत्तेसाठी सोडले पक्ष..जनतेचे आहे लक्ष; निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारले

By विश्वास पाटील | Updated: February 14, 2024 11:38 IST

कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत सहा आमदार व दोन खासदारांनी त्यांना निवडून दिलेल्या पक्षाला फाट्यावर मारून सत्तेसाठी दुसऱ्याच पक्षाशी घरोबा केला आहे. त्याची सुरुवात १९९० च्या निवडणूकीत झाली. परंतू कोल्हापूरने ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा निवडून दिलेले नाही हा इतिहास आहे. आता कोल्हापूरचा स्वाभिमानी, जागरुक माणूस आगामी लोकसभा व विधानसभेला त्याची पुनरावृत्ती करतो की सत्तेला सलाम करून पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा गुलाल लावतो हीच उत्सुकता असेल. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गोष्टींना उजाळा मिळाला आहे.जिल्ह्याने १९९० च्या निवडणूकीत शिवसेनेचे दोन आमदार पहिल्यांदा निवडून दिले. बाबासाहेब पाटील सरुडकर शाहूवाडीतून व कोल्हापूर शहरातून नवखे दिलीप देसाई विजयी झाले. पुढच्या राजकारणात तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ यांच्या संगतीने या दोघांनीही शिवसेना सोडली व काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतू पुढच्या १९९५ च्या निवडणूकीत या सरुडकर व देसाई यांच्या पत्नी शिवानी देसाई यांचा पराभव झाला.शाहूवाडीतून संजयसिंह गायकवाड अपक्ष म्हणून विजयी झाले व कोल्हापूरातून शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना लोकांनी निवडून दिले. त्यानंतर दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी २००९ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्याविरोधात बंड केले आणि अपक्ष निवडणूक लढवून विजय खेचून आणला. या लढाईला अस्मितेच्या लढाईचे स्वरुप प्राप्त झाले.

चालू पंचवार्षिकमध्ये मात्र महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही फाटाफुटीचे पेव फुटले. शिवसेनेमुळेच विजयी झालेले खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटाशी घरोबा केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेने दोनवेळा आमदार केले. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून येवूनही त्यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले. या दोघांनीही पक्ष सोडला.राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची संगत सोडून अजित पवार यांच्यासोबत ते भाजपच्या सरकारमध्ये गेले. रोज उठता-बसता फुले-शाहू -आंबेडकर यांचा जप करणाऱ्या मुश्रीफ यांनी आता मोदी यांना पंतप्रधान करण्याचा विडाच उचलला आहे.याशिवाय जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलला आहे. त्यातील कांहीना मतदार संघाची अपरिहार्यता होती. प्रस्थापित पक्षात संधी मिळत नसल्यानेही कांहीनी मुळ पक्षाला रामराम केला.

  • माजी आमदार महादेवराव महाडिक यांना कधीच कोणत्याच पक्षाच्या विचारधारेशी देणेघेणे नव्हते. ते स्वत:लाच एक पक्ष समजत होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेससह सोयीनुसार शिवसेनेशीही सलगी केली. संधी मिळताच मुलग्याला भाजपमध्ये नेवून आमदार केले.
  • ज्यांच्या दोन पिढ्या काँग्रेसच्या विचारात वाढल्या, त्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या निवडणूकीत मतदार संघातील भाजपच्या प्रभावाला शरण जावून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व अपक्ष म्हणून निवडून आले. ते आता भाजपच्या सोबत आहेत.
  • माजी खासदार निवेदिता माने यांचे सासरे दिवंगत बाळासाहेब माने हे इचलकरंजीचे पाचवेळा खासदार होते परंतू त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना व आता शिंदे शिवसेना असा प्रवास केला.
  • धनंजय महाडिक यांची राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरु झाली. शिवसेनेनेच त्यांना लोकसभेला पहिल्यांदा संधी दिली. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांची पाच वर्षे कुजवली व नंतर खासदार केले. तिथेही पराभव होताच त्यांनी वारे पाहून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.
  • समरजित घाटगे यांचे मुळ घराणे काँग्रेसचे. विक्रमसिंह घाटगे एकदा अपक्ष, नंतर काँग्रेसकडून आमदार झाले. शिवसेनेकडून एक लोकसभा लढवली. परंतू समरजित यांची राजकीय सुरुवात भाजपमधून झाली.
  • माजी खासदार राजू शेट्टी यांचा स्वत:चा पक्ष असला तरी त्यांनी खासदार झाल्यावर पहिल्या टर्ममध्ये काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर २०१४ ला त्यांना भाजप बरा वाटला. तिथे भ्रमनिरास झाल्यावर २०१९ ला पुन्हा ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आता अजून त्यांचे तळ्यातमळ्यात सुरु आहे.
  • संभाजीराजे यांची राजकीय कारकिर्द राष्ट्रवादीतून सुरु झाली. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार केले. आता ते पुन्हा काँग्रेसच्या सोबत राजकारण करण्याच्या तयारीत आहेत.
  • विनय कोरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवून आमदार झाले नंतर त्यांनी जनसुराज्य पक्ष स्थापन करून काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला. आता ते भाजपच्या सोबत आहेत.
  • संजय घाटगे यांची राजकीय कारकिर्द काँग्रेसमधून सुरु झाली.त्यानंतर त्यांनी जनता दल, शिवसेना, परत काँग्रेस, परत शिवसेना नंतर स्वाभिमानी व त्यानंतर दोनवेळा शिवसेना अशी फेऱ्या मारल्या. एवढ्या काळात त्यांना जून १९९८ ते ऑक्टोबर १९९९ या काळात दीड वर्षे आमदारकीची संधी मिळाली.
  • उल्हास पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडवे कार्यकर्ते परंतू विधानसभेला संघटनेला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आणि आमदार झाले. आता पुन्हा ते संघटनेच्या जवळ आले आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण