शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कोल्हापूरच्या अवकाशात होते सहा मिनिटे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:25 PM

एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही नसून चक्क आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होते.

ठळक मुद्देकोल्हापूरात अनेक खगोलप्रेमींनी स्थानक प्रत्यक्ष पाहिलेढगाळ हवामानामुळे अनेकांना दर्शन झाले नाही

संदीप आडनाईक

कोल्हापूर : एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही नसून चक्क आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होते.कोल्हापूरात अनेक खगोलप्रेमींनी सोमवारी हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक प्रत्यक्ष पाहिले. चंद्राच्या अगदी जवळून प्रवास करताना हे अवकाश स्थानक कोल्हापूरच्या अवकाशात पृथ्वीवरुन सरासरी ३५0 किलोमीटर उंचीवर होते. अवकाशातून प्रवास करणाऱ्या एखाद्या विमानाप्रमाणेच चमचम करत ते क्षणार्धात दिसेनासे झाले. या स्थानकाचा वेग इतका प्रचंड होता, की ते काही मिनिटांत चीनच्या सीमारेषेपार गेले. काही परिसरात ढगाळ हवामानामुळे अनेकांना त्याचे दर्शन झाले नाही.खगोल अभ्यासक प्रा. अविराज जत्राटकर यांनी यळगूड, ता. कागल येथून तर त्यांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूरातून हा अनुभव घेतला. निवृत्त रेल्वे कर्मचारी शशिकांत शिवाजीराव नाईक यांनी जीवबानाना पार्क येथून तर बांधकाम व्यावसायिक मिलिंद नाईक यांनी कळंबा येथे प्रवासात थांबून हे स्थानक पाहिले.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन अंतराळात बांधले गेलेले संशोधन केंद्र आहे. हे स्थानक पृथ्वीपासून जवळच्या कक्षेत फिरते आणि मानवाला उघड्या डोळ्यांनी दिसते. फुटबॉलच्या मैदानाएवढे आकाराने मोठे असणारे हे स्थानक पृथ्वी भोवती ४०० किलोमिटर उंचीवरून दिवसाला जवळपास १५ फेऱ्या पूर्ण करते.

तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे. 

कोल्हापूरकरांना सायंकाळी पुन्हा पाहता येईल स्थानकपृथ्वीभोवती ९१ मिनिटांत हे अवकाश स्थानक प्रदक्षिणा घालत असल्याने ते पुन्हा पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. २३, २४ आणि २५ मे रोजी हे अवकाश स्थानक पुन्हा कोल्हापूरच्या अवकाशात पहायला मिळेल. ते दि. २३ रोजी पहाटे ४.२४ मिनिटांनी एक मिनिटासाठी, तर सायंकाळी ७. १८ मिनिटांनी ५ मिनिटांनी दिसेल.

दि. २४ मे रोजी पहाटे ५ वाजून 0८ मिनिटांनी सहा मिनिटांसाठी तर २५ मे रोजी पहाटे ४ वाजून २0 मिनिटांनी अवघ्या दोन मिनिटांसाठी हे स्थानक दिसू शकेल. अर्थात हे स्थानक क्षितिजाच्या अगदी जवळून जाणार असल्यामुळे फारच कमी कालावधीसाठी दिसणार आहे. हे स्थानक दक्षिण-पश्चिम दिशेतून वर येताना दिसेल. सिंह राशीतला मघा तारा आणि कन्या राशीतला चित्रा तारा यांच्या मध्ये हे स्थानक दिसणार आहे आणि ते शोधायलाही सोपे जाणार आहे.

आॅनलाईन लोकमतच्या वृत्तामुळे हे अवकाश स्थानक मी कोल्हापूरात प्रत्यक्ष पाहू शकलो. उघड्या डोळ्यांनी हे स्थानक पाहण्याचा एक वेगळा अनुभव मी घेतला. पूर्ण तयारी करुन पुन्हा असाच अनुभव घेण्यासाठी मी सज्ज आहे.मिलिंद शशिकांत नाईक,बांधकाम व्यावसायिक, कोल्हापूर

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरscienceविज्ञान