शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा धरणे भरली

By admin | Updated: August 7, 2014 00:42 IST

पाच धरणे भरण्याच्या मार्गावर : ११ रस्ते अद्याप बंदच, पावसाचा जोर ओसरला

कोल्हापूर : पुढील वर्षभरातील पिण्याच्या, तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्यानंतर आता पावसाचा जोर हळूहळू ओसरायला लागला आहे. दोन दिवसांपासून पावसाचा वेग मंदावल्याने नद्यांचे पाणीही कमी होत आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणे तुडुंब भरली असून, अन्य पाच धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ११ मार्ग अद्याप पाण्याखाली असून, त्या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. गेल्या १५-२० दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर होता. त्यामुळे नद्या, नाले, ओढे पात्राबाहेर पडून वाहत होते. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर ओसरत असल्याचे दिसत आहे. आज, बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत केवळ २८.२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमुख आगर मानल्या गेलेल्या गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०३ मिलिमीटर पाऊस झाला, तर सर्वांत कमी शिरोळ तालुक्यात १० मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे (क्रमांक ३ व ६) अद्यापही उघडलेले आहेत. या धरणातून ४८०० क्युसेक्स पाणी दर सेकंदाला विसर्ग होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख राधानगरी धरणासह कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे ही धरणे यापूर्वीच भरून वाहत आहेत, तर सर्वांत मोठे धरण असलेल्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणासह वारणा, कासारी, कुंभी, पाटगाव ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत. दूधगंगा ८१ टक्के, वारणा ९२ टक्के, कासारी ९६ टक्के भरले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात घट होत असली तरी जिल्ह्यात ११ रस्ते पाण्याखालीच आहेत. भोगावती नदीवरील खडक कोगे, सरकारी कोगे, राशिवडे, हळदी, शिरगाव, पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, तसेच कासारी नदीवरील यवलूज, ठाणे, आवळे, पुनाळ, तिरपण, वाळोली, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, मांगले, सावर्डे, कोडोली, चावरे, शिरगाव, खोची, दानोळी, वेदगंगा नदीवरील कुरणी, चिखली, बस्तवडे असे १८ बंधारे पाण्याखाली आहेत. (प्रतिनिधी)