शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील सहा नगरसेवक सेनेच्या गळाला -: आठवड्यात ‘मातोश्री’वर प्रवेशाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:09 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश

ठळक मुद्दे लोकसभेचे पडसाद

राजाराम पाटील ।इचलकरंजी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या पवित्र्यात आहेत. आठवड्याभरात हा प्रवेश ‘मातोश्री’वर पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रामध्ये खळबळजनक घडामोडी घडल्या. पूर्वाश्रमीचा माने गट पुन्हा संघटित झाला. शिवसेनेचे धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तब्बल ३५ हजार मताधिक्य मिळाले. साहजिकच निवडणुकीतील या घडामोडीचे परिणाम आता शहरातील आणि पर्यायाने नगरपालिकेतील राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत.

शिवसेनेकडून श्रीमती निवेदिता माने यांनीही लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी शिवसेनेच्याच उमेदवारीवर त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी निवडणूक लढविली आणि त्यांनी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला. ही घटना इचलकरंजीच्या नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरली. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेतील सत्तारूढ अगर विरोधी आघाडीमध्ये असलेल्या अनेक नगरसेवकांनी माने यांना या निवडणुकीत मदत केली. त्याचेच परिणाम आता येथील राजकीय गोटामध्ये दिसू लागले आहेत.

माने यांच्यापाठोपाठ शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांपैकी एका प्रमुख नगरसेवकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे, असे ‘त्या’ नगरसेवकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमध्ये चार नगरसेवक सत्तारूढ आघाडीतील आहेत. त्यापैकी एकजण पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. तसेच एक नगरसेवक अपक्ष आणि दोन नगरसेवक ‘ताराराणी’चे आहेत. उर्वरित दोघे नगरसेवक शाहू आघाडीतील आहेत. कारण हे दोघे त्यांच्याच पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याने ते माने यांच्याबरोबरीनेच शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छितात, असेही ‘त्या’ नगरसेवकाने स्पष्ट केले. मात्र, या राजकीय घडामोडींबाबत कमालीची गुप्तता राखली जात आहे.सत्तारूढ आघाडी अबाधितचइचलकरंजी नगरपालिकेमध्ये सत्तारूढ आघाडीमध्ये भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेसमधील जांभळे गट व ताराराणी आघाडी यांचा समावेश आहे, तर विरोधात कॉँग्रेस व शाहू विकास आघाडी आहे. पालिकेमधील या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तरी पालिकेतील सत्तेमध्ये शिवसेना असल्यामुळे नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडी अबाधित राहणार आहे. शिवसेना प्रवेशामुळे सत्तारूढ आघाडीची संख्या दोनने वाढवून ती ३६ होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण