शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

साहेब... सत्काराबरोबर कायम करायचे तेवढे बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 10:39 IST

जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे.

विनोद सावंतकोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जात आहे. सत्कार करणे चांगलेच आहे; परंतु गेल्या २०-२२ वर्र्षांपासून कायम होणार या आशेने रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाऱ्यांची ह्यसाहेब... सत्काराबरोबर कायम करायचे तेवढे बघा,ह्ण अशी भावना व्यक्त होत आहे. महापूर असो की कोरोना; जिवाची पर्वा न करता काम करणा-या या कर्मचा-यांचा आता तरी महापालिका विचार करणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जगात कोरोनो विषाणूने थैमान घातला आहे. खासगी कंपनी, व्यवसाय येथील कर्मचारी सुट्टीवर आहेत; तर कोल्हापूर महापालिकेचा सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. कोल्हापूरकरांकडून त्यांना भरघोस सहकार्य होत आहे. मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, गमबूट-सॉक्स देण्यात येत आहे. तसेच गल्लीबोळात त्यांना कोल्हापुरी फेटे, नोटांचा हार, पुष्पवृष्टी, औक्षण केले जात आहे.

नागरिकांसह आजी-माजी नगरसेवक यासाठी पुढाकार घेत आहेत. आपत्कालीन परिस्थिती काम करीत असल्याबद्दल सत्कारास ते पात्र आहेत; परंतु सत्कार केला, विषय संपला, असे होता कामा नये. २० ते २२ वर्षे प्रामाणिकपणे पहाटे उठून परिसराची स्वच्छता करणाºया या सफाई कर्मचाºयांचे कायम होण्याचे स्वप्न पूर्ण करणे हाच त्यांचा खरा सन्मान ठरणार आहे. महापालिकेतील सत्ता असणारे नेते आणि नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यास हे शक्य आहे.आरोग्य विभागातील स्थिती एकूण कर्मचारी- २०००कायम कर्मचारी - १६५० झाडू कामगार- १२५०रोजंदारीवरील कर्मचारी- ३५०सफाई कर्मचारी- २५०ड्रेनेज सफाई कर्मचारी- ६८टिपरवर हेल्पर- १०४आरोग्य निरीक्षक - १६कायम आरोग्य निरीक्षक- २  रोजंदारी कर्मचा-यांसमोरील समस्या- हजेरी भरली तरच पगार- महापालिकेच्या सुविधांपासून वंचित- वारसाला नोकरी मिळत नाही.- वैद्यकीय सुविधा मिळत नाही.- वैद्यकीय रजा नाही.- सुट्टीचा पगार नाही.   सेवानिवृत्तीला आले तरी कायम नाहीकायम होणार या आशेवर सफाई कर्मचाºयांकडून काम केले जात आहे. काहीजण पुढील दोन-चार वर्षांनी सेवानिवृत्त होणार आहेत. पुढील दोन वर्षांत जरी ते कायम झाले तरी पेन्शन मिळणार नाही. उतारवयात उदरनिर्वाह कसा करायचा, असाही त्यांच्यासमोर प्रश्न आहे. 

अनेक वर्षांपासून काही सफाई कर्मचारी रोजंदारीवर काम करीत आहेत. त्यांना कायम करून घेणे आवश्यक आहे. मात्र, आस्थापनाचा खर्च वाढत असल्यामुळे कायम करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.                                                            - जयवंत पोवार, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका. 

 

गेल्या २२ वर्षांपासून प्रामाणिकपणे सफाईचे काम करीत असून अजूनही कायम नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून सत्कार होतो ही आनंदाची बाब आहे; परंतु सत्काराने आमचे प्रश्न सुटणार नाहीत. कायम केल्यास आमचे स्वप्न पूर्ण होऊन हाच आमचा खरा सत्कार ठरेल.- सिकंदर कुचकोरवी, सफाई कर्मचारी, कदमवाडी परिसर  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका