शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सर आली धावून, बंधारे गेले वाहून

By admin | Updated: June 22, 2014 00:40 IST

धामणी नदीवर मातीच्या बंधाऱ्यांची स्थिती : हजारो टन माती, झाडे, लाखोंचा खर्च वाया

सांगशी : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धामणी नदीवर बांधलेले मातीचे बंधारे पावसाच्या पहिल्या सरीबरोबर वाहून गेले आहेत. बंधाऱ्यांसाठी लागलेली हजारो टन माती, कित्येक झाडे, लाखो रुपयांचा खर्च व शेतकऱ्यांचे श्रमसुद्धा या बंधाऱ्यांच्या रूपाने वाहून गेले आहेत.वार्षिक सरासरी ६००० मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या धामणी परिसरात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. एरव्ही पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी धामणी नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. पावसाळा संपताच नदीचे पाणी अडवण्यासाठी मातीच्या बंधाऱ्यांचे नियोजन या परिसरातील शेतकरी करतात. बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शेती, जनावरे व खर्चासाठी काटकसरीने केला जातो. या परिसरातील ४० गावांच्या शेतीचा आधार हे माती बंधारे ठरतात. सुमारे २० किलोमीटरच्या नदीपरिसरात तब्बल मातीचे आठ ते दहा बंधारे शेतकरी स्वखर्चाने बांधतात. क्षेत्रनिहाय खर्चाची तरतूद करून हे बंधारे बांधताना परिसरातील पिकाऊ माती, छोटी-मोठी झाडे यांचा वापर करतात. प्रत्येक बंधाऱ्यास सरासरी दोन हजार टन माती, झाडे व लाखभर रुपये खर्चाचा भुर्दंड शेतकरी स्वत: सोसतात. मोबदल्यात साठणाऱ्या पाण्यातून सहा महिने शेतीसाठी पाण्याची सोय करतात. उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात हे मातीचे बंधारेदेखील कोरडे पडतात. खड्डे कोरडे पडल्यावर उरते आशा ती फक्त वळवाच्या व मान्सूनच्या आगमनावर. मान्सूनच्या आगमनाने पाणीटंचाईची समस्या संपते. मात्र, उन्हाळभर आधार ठरलेले मातीचे बंधारे मात्र पुन्हा शेतकऱ्यालाच फोडावे लागतात.गत आठवड्यापासून मान्सूनच्या पडणाऱ्या पावसामुळे आता या परिसरातील शेतकरी हे मातीचे बंधारे फोडण्यात व्यस्त आहेत. (वार्ताहर)