गडहिंग्लज : शहरातील ‘किलबिल’ विद्यामंदिरात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा अंजली हत्ती यांच्याहस्ते झाले. यावेळी शहर व तालुक्यातील पत्रकारांना ऑनलाईन शुभेच्छा देण्यात आल्या.
-------------------------------
२) हसूरचंपूत पत्रकार दिन
गडहिंग्लज : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक ए. एस. पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी पत्रकार दिनाविषयी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
-------------------------------
३) संकेत सावंत राज्य समन्वयकपदी
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत सावंत याची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता विभाग राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याकामी बाजीराव खाडे यांनी प्रयत्न केले. प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीस डॉ. वैष्णवी किराळ यांनी निवडीचे पत्र दिले.
* संकेत सावत : ०६०१२०२१-गड-०८