गडहिंग्लज : येथील हजरत पिरानेपीर मेहबूब सुबहानी दर्गाह शरिफचा उरूस बुधवार (दि.२७) पासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी व मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतील. २७ ते २९ जानेवारीअखेर होणाऱ्या उरुसामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरीच नैवेद्य अर्पण करून उरूस साजरा करण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. ------------------------- २) आनंद खोत यांना समाजरत्न पुरस्कार
गडहिंग्लज :
येथील जागृती हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी आनंद शिवराम खोत यांना यंदाचा जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार रामभाऊ गुंडिले, राजू तोडसम यांच्या हस्ते खोत यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खोत यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास बाळासाहेब चव्हाण, अजित पाटील, नाळे महाराज, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.
३) गडहिंग्लजमध्ये क्रिकेट स्पर्धांना प्रतिसाद
गडहिंग्लज : येथील संघर्ष ग्रुपतर्फे खुल्या हाफ स्पिच क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत जय गणेश सावंतवाडी, भडगाव स्पोटर्स, शिवाजी चौक, गडहिंग्लज, संयुक्त पेठ गडहिंग्लज यांनी यश मिळविले. स्पर्धेत १६ संघांनी भाग घेतला. विजेत्यांना तहसीलदार दिनेश पारगे, तुषार यमगेकर, सुनील शिंत्रे, आप्पा शिवणे आदींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
- ४) विवेक मोरे व रोहिणी पाटीलची निवड
गडहिंग्लज : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विवेक नारायण मोरे व रोहिणी लक्ष्मण पाटील यांची भोपाळ (मध्यप्रदेश) येथे २५ ते २७ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी तर ६ ते १० फेब्रुवारीअखेर आसाम येथे होणाऱ्या ज्युनिअर स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत विवेकने १०००० मी. धावणेत सुवर्णपदक तर रोहिणीने ८०० मी. धावणेत रौप्यपदक मिळविले आहे. त्यांना क्रीडाशिक्षक सुरेश धुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
* विवेक मोरे : २१०१२०२१-गड-०१
* रोहिणी पाटील : २१०१२०२१-गड-०२