तुर्केवाडीत सोमवारी मुलाखती
गडहिंग्लज : तुर्केवाडी येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूटमध्ये सोमवार (दि. २१) कॅम्पस् मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. एमडब्ल्यूआयटी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे डिप्लोमा इन मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता या मुलाखती होत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या लिंकवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
गिजवणे येथे बीजप्रक्रिया किटचे वितरण
गडहिंग्लज : गिजवणे येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बीजप्रक्रिया किटचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तालुक्यात नाचणी, भात, सोयाबीन या पिकांचे प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. कृषी पर्यवेक्षक अरुण खोत यांनी १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक के. व्ही. मोर्ती यांनी सोयाबीन व भात बीज प्रक्रियासंबंधी माहिती दिली. तालुक्यात १८३ एकर तर नागली ५० एकरावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. या वेळी कृषिसेवक वाय. डी. नाईक आदींसह शेतकरी उपस्थित होते.
---
) पेरणोलीत देसाई, सावंत यांचा सत्कार
पेरणोली : आजरा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पेरणोलीचे उपसरपंच उत्तम देसाई व शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत यांचा पेरणालीतील विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी अमर पवार, अतुल देसाई, पांडुरंग दोरूगडे, प्रवीण कांबळे, काकासाहेब देसाई, दिंगबर हावलदार, दीपक लोखंडे, मारुती परीट आदी उपस्थित होते.
-
४) कळसगादेत काढ्याचे वाटप
गडहिंग्लज : कळसगादे येथे मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा दळवी यांनी ग्रामस्थांना आयुर्वेदिक काढ्याचे वितरण केले. याकामी डॉ. सुनील काणेकर, उपसरपंच अस्मिता दळवी, उपसरपंच स्नेहल दळवी, पोलीस पाटील सदानंद सुतार यांनी परिश्रम घेतले.
-
५) राष्ट्रवादी सेवा दल तालुकाध्यक्षपदी पाटील
गडहिंग्लज : हिटणी येथील माजी सरपंच भरत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडहिंग्लज तालुका सेवा दल सेल अध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर आदी उपस्थित होते.
* भरत पाटील : १८०६२०२१-गड-०९