शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : माणुसकी जपण्याची भूमिका जीवन आनंद संस्था पार पाडते : सतीश कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:40 IST

रक्ताची नाती दुरावतात. आपलेच लोक आपल्याच लोकांना दूर लोटतात. अशावेळी आधार देण्याची, माणुसकी जपण्याची भूमिका जीवन आनंद संस्था पार पाडते, असे उद्गार फोंडाघाट महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी काढले. ते महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ठळक मुद्देमाणुसकी जपण्याची भूमिका जीवन आनंद संस्था पार पाडते : सतीश कामतमहिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रम

फोंडाघाट : रक्ताची नाती दुरावतात. आपलेच लोक आपल्याच लोकांना दूर लोटतात. अशावेळी आधार देण्याची, माणुसकी जपण्याची भूमिका जीवन आनंद संस्था पार पाडते, असे उद्गार फोंडाघाट महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी काढले. ते महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते म्हणाले, समाजात जे अनेक गंभीर प्रश्न आहेत त्यापैकी महत्त्वाचा प्रश्न मनोरुग्णांचा, निराधारांचा, अनाथांचा आहे. या घटकांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठीच जीवन आनंदसारख्या संस्था महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. विद्या मोदी यांनी केले. समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये निराधारांविषयी जागृती व्हावी हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब, उदय कामत, आशिष कांबळे यांचा डॉ. कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी संदीप परब यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने आपला अनुभव कथन करून जीवन आनंद संस्थेचे कार्य कसे चालते, ते स्पष्ट केले. तरुणाईच्या उत्साहाबरोबर ज्येष्ठांचा अनुभव देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून वृद्धांची काळजी घ्या. सेवाभाव जोपासा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. जगदीश राणे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. एस. आर. रायबोले, प्रा. डी. बी. ताडेराव, प्रा. एस. एम. आखाडे, डॉ. आर. बी. पाटील, प्रा. व्ही. व्ही. पाटील, प्रा. मयुरी सावंत, प्रा. सारीका राणे, प्रा. रूपाली माने, प्रा. डॉ. डाफळे आदी शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयsindhudurgसिंधुदुर्ग