शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 16:28 IST

गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

ठळक मुद्दे हत्तींना पकडून माणसाळविण्यात येणार, आजरा येथे प्रशिक्षण केंद्र शेतकऱ्यांना दिलासा;  वनविभागाचा वरिष्ठस्तरावर प्रस्ताव 

सिंधुदुर्ग : गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे.

या पकडलेल्या हत्तींना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात सोडून त्या ठिकाणच्या बंदिस्त जागेत त्यांना माणसाळविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव वनविभागाने वरिष्ठ स्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिलारीतील हत्ती उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि पर्यायाने कोकणला हत्ती हा प्राणी दुर्मीळच! मात्र सन २००२ मध्ये कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केल्यानंतर सिंधुुदुर्गात हत्तींचे कुतूहल कमी झाले. दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे प्रथम हत्तींनी प्रवेश केला आणि तेथूनच हत्तींचा प्रवास सुरू झाला.

भातशेती, केळी, पोफळी, माड बागायतींचे दर दिवशी कोट्यवधी रुपयांचे नुकसान करीत या हत्तींनी थेट जिल्ह्याचे मुख्यालय असलेले ओरोस गाठले आणि हत्ती उपद्रवाची झळ संपूर्ण जिल्ह्याला बसली.त्यानंतर पर्यटकांनाही हे हत्ती पाहण्यासाठी उपलब्ध होतील. हा एलिफंट कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरेल, अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर गेल्यावर्षीच पाठविला असून, मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.पकडलेल्या हत्तींना माणसाळविण्यासाठी आजराच का? तेथील जमीन निश्चित करण्यामागचे कारण काय? याबाबत पुराणिक यांना विचारले असता त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली. हत्तींना थंड वातावरण, सपाट-विस्तीर्ण जागा आवश्यक असते, जी आजऱ्यात उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी तिलारीचा परिसर नैसर्गिक अधिवास होऊ शकत नाही.

तिलारीतील वातावरण उष्ण आहे. शिवाय जमीनही सपाट नाही. त्यामुळे हत्तींना माणसाळविण्यासाठी आजऱ्याचा परिसर आणि वातावरण पोषक आहे. शिवाय हत्तींचा लोकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.मंत्र्यांकडून पाठपुरावापालकमंत्री दीपक केसरकर हत्ती प्रश्नाबाबत संवेदनशील आहेत. त्यांनाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी वनविभागाची योजना चांगली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. लवकर हत्तींना पकडून माणसाळविण्यात येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग