शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेते दिलीप मोरे यांचा प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र विक्रेते दिलीप मोरे यांना राजारामपुरी ते जवाहरनगर येथे वृत्तपत्र वाटप करताना शनिवारी सकाळी मिळालेले ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र विक्रेते दिलीप मोरे यांना राजारामपुरी ते जवाहरनगर येथे वृत्तपत्र वाटप करताना शनिवारी सकाळी मिळालेले पैशांचे पाकीट त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. या पाकिटामध्ये तीन एटीएम् कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व रोख ३२६० रुपये होते.

जवाहरनगर रोडवर सापडलेले पाकीट त्यांनी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हणगुत्ते यांच्याकडे दिले. हे पाकीट तपासून पाहिले असता संबंधित पाकीटधारक हे सिध्देश लोहार यांचे असल्याचे समजले. त्याच्याशी संपर्क साधून लोहार यांना हे पाकीट परत करण्यात आले.

मोरे यांना देऊ केलेले बक्षीस त्यांनी नम्रपणे नाकारले. यावेळी कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशन अध्यक्ष किरण व्हणगुत्ते, सुरेश ब्रम्हपुरे, सतीश दिवटे, अनिल चव्हाण, दाजी मोरे, संजय पवार उपस्थित होते.

२८०८२०२१-कोल-वितरण फोटो

वृत्तपत्र वाटप करताना रस्त्यात सापडलेले पैशांचे पाकीट परत केल्याबद्दल दिलीप मोरे यांचा कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशन अध्यक्ष किरण व्हणगुत्ते यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश ब्रम्हपुरे, सतीश दिवटे, अनिल चव्हाण, दाजी मोरे, संजय पवार उपस्थित होते.