शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदी उद्योजकांची 'कसोटी', कर्जास ढीगभर अटी; कोल्हापूर जिल्ह्यातून सव्वाशे कोटींचा कर देवूनही मिळेना कर्ज 

By पोपट केशव पवार | Updated: April 5, 2025 16:43 IST

पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे उद्योग - व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदरात कर्ज अन् अनुदानाच्या ढीगभर योजना सरकारकडून राबवल्या जात ...

पोपट पवारकोल्हापूर : एकीकडे उद्योग - व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदरात कर्ज अन् अनुदानाच्या ढीगभर योजना सरकारकडून राबवल्या जात असताना दुसरीकडे हजारो जणांना रोजगार देणाऱ्या चांदी उद्योगाला एक पै चेही कर्ज बँकांकडून दिले जात नसल्याचे चित्र आहे.

बँकांचे कर्जच मिळत नसल्याने सरकारकडूनही चांदी उद्योगाला कोणत्याच प्रकारचे अनुदान, सवलत मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, चांदी उद्योगाची वाढ खुंटली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरातून चांदी उद्योजक वर्षाला १२५ कोटी रुपयांचा कर शासनाला भरतात. मात्र, याच उद्योजकांना एक रुपयाचेही कर्ज बँकांकडून दिले जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्ह्यात हुपरी परिसरात हस्तकला चांदी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. येथील कलाकुसर केलेल्या चांदीला देशभरात प्रचंड मागणी आहे. हजारांवर चांदी उद्योजक या परिसरात असून या व्यवसायामुळे हजारो तरुणांना राेजगाराची संधी मिळाली आहे. पूर्वी चांदी उद्योगाला खासगी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही कर्ज दिले जात होते.मात्र, मागील दहा वर्षांपूर्वी साेने-चांदी व्यवसायात असलेला नीरव मोदी कोट्यवधी रुपयांची बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळाल्याने सोने-चांदी व्यावसायिकांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली. त्याचा परिणाम म्हणजे थेट रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पत्र लिहून सोने-चांदी व्यावसायिकांना कर्ज देताना प्रचंड अटी टाकल्याने या व्यावसायिकांना कर्ज मिळण्याचा मार्गच बंद झाला आहे. चांदी उद्योग हस्तकलेवर अवलंबून आहे. मात्र, जर या व्यवसायात ७० टक्के मशिनरी असेल तरच कर्जाचा विचार करू, असे बँकांकडून सांगितले जाते. त्यामुळे बँकांची ही अट या व्यवसायवाढीला मारक ठरत आहे.थेट जिल्हाधिकाऱ्यांना साकडे तरीही..हुपरी परिसरातील चांदी उद्योजक दिवसेंदिवस वाढत आहेत. येथील उद्योग अजून वाढावा, नव्या उद्योगाची भर पडावी, यासाठी बँकांच्या अर्थसहाय्याची गरज भासते. बँकांनी चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करावा, त्यासाठी बँकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे मोहन खोत यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली होती. त्यांच्या आदेशाने शिखर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही या बँकांकडून कर्ज दिले जात नसल्याचे चित्र आहे.

दृष्टिक्षेपात व्यवसाय

  • चांदी व्यावसायिक - ७ हजार
  • मिळालेला रोजगार - ३५ हजार
  • वर्षाला भरला जाणारा जीएसटी - १२५ कोटी.

बँकांकडून चांदी उद्योगाला कर्जपुरवठा होत नसल्याने व्यवसायाची वाढ खुंटली आहे. जिल्हा प्रशासनाने सरकारी व सहकारी बँक प्रतिनिधींची बैठक बोलवून चांदी उद्योगाला कर्जपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात. - मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक