शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन सायक्लोथॉनमध्ये सांगलीचे दिलीप माने ठरले सिकंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:29 IST

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात रविवारी सकाळी झालेल्या १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकाविला. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी असे अंतर सर्वांत कमी वेळेत पूर्ण केले.

ठळक मुद्देपरदेशी स्पर्धकांसह देशभरातील ३०० स्पर्धकांची हजेरीमहिलांमध्ये सुमित्रा खानविलकर यांची बाजी

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित केलेल्या डेक्कन सायक्लोथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात रविवारी सकाळी झालेल्या १२० किलोमीटर शर्यतीमध्ये सांगलीच्या दिलीप माने याने प्रथम क्रमांक पटकाविला. माने याने शिवाजी विद्यापीठ ते संकेश्वर ते परत शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी असे अंतर सर्वांत कमी वेळेत पूर्ण केले.

यासोबतच विविध गटांत हेमंत लोहार, प्रतीक्षा चौगुले, नितीन नारगोलकर, उज्ज्वल ठाणेकर, श्रुती कुंभोजे, सुमित्रा खानविलकर, सुधीर नकाते (सर्व कोल्हापूर); तर रमा जाधव, शिल्पा दाते (सांगली), अंजली भालिंगे (पुणे) या सायकलपटूंनीही आपापल्या गटात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला.स्पर्धेतील निकाल असे, १२० कि.मी. (शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी ते संकेश्वर, पुन्हा शिवाजी विद्यापीठ) - पुरुषांमध्ये दिलीप माने (सांगली), सुदर्शन देवडीकर (कोल्हापूर), प्रकाश ओलेकर (सांगली), वेदान्त हेलर्नेकर (पुणे), अ‍ॅरॉन केन (लंडन, सध्या रा. पुणे), फ्लॅक नेल्सन (पल्लीतुरा, केरळ), अभिनात मुरली (केरळ), केवल्य सनमुद्रा (पुणे).५० कि.मी. (पुरुष)- शिवाजी विद्यापीठ ते अप्पाचीवाडी ते पुन्हा शिवाजी विद्यापीठ)- हेमंत लोहार (कोल्हापूर), किरण बंडगर (सांगली), सिद्धेश पाटील (कोल्हापूर); तर महिलांमध्ये १६ ते ३६ वयोगट - प्रतीक्षा चौगुले (कोल्हापूर), निशाकुमारी यादव (सांगली), मानवी पाटील (गडहिंग्लज).३६ ते ५० वयोगट- रमा जाधव (सांगली), साजीद सय्यद (सांगली), जॉर्ज थॉमस (कºहाड). ५० वर्षांवरील गट - नितीन नारगोलकर (कोल्हापूर), राम बेळगावकर (कोल्हापूर), जीवदास शहा (सातारा). महिलांमध्ये शिल्पा दाते (सांगली), नेहा टिकम (पुणे), सुचित्रा काटे (कोल्हापूर). ५० वर्षांवरील- अंजली भालिंगे (पुणे).२० कि.मी. - शिवाजी विद्यापीठ ते पंचतारांकित एमआयडीसी, पुन्हा शिवाजी विद्यापीठ - १५ ते ३० वयोगट- श्रुती कुंभोजे (साजणी). ३० ते ५० वयोगट- सुमित्रा विश्वविजय खानविलकर (कोल्हापूर), आरती संघवी (कोल्हापूर).स्पर्धेचे उद्घाटन के. एस. ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, कोल्हापूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनेच अध्यक्ष विजय जाधव, डेक्कन स्पोर्टस्चे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष जयेश कदम, वैभव बेळगावकर, अभिषेक मोहिते, अतुल पोवार, अमर धामणे, संजय चव्हाण, प्रशांत काटे, समीर चौगुले, राजू लिंग्रस, आदी उपस्थित होते.स्पर्धेचा बक्षीस समारंभ महापौर सरिता मोरे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विजय जाधव, विश्वविजय खानविलकर, उदय पाटील, जयेश कदम, वैभव बेळगावकर, अभिषेक मोहिते, आदी उपस्थित होते.पर्यावरणाचा समतोल असलेले विनाखर्चाचे वाहन म्हणून सायकल हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. याशिवाय सर्वोत्तम व्यायाम म्हणूनही सायकलिंगकडे पाहिले जाते. त्यामुळे सायकलिंगचा टक्का शहरासह जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्याचा परिपाक म्हणून चेन्नई, गुजरात, आंध्रप्रदेश, हरियाणा, बंगलोर, महाराष्ट्रसह कोल्हापुरातील सायकलपटूंनीही या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

विशेष म्हणजे उद्घाटक म्हणून लाभलेले मालोजीराजे छत्रपती व त्यांचे मेहुणे विश्वविजय खानविलकर, उद्योजक रवींद्र पाटील-सडोलीकर, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भाग घेऊन ५० कि.मी. अंतराची स्पर्धा पूर्ण केली. याशिवाय लंडनमधील अ‍ॅरॉन केन हा परदेशी पाहुणाही या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने १२० कि.मी. स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला. पंच म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव यांनी काम पाहिले. स्पर्धा मार्गात चार रुग्णवाहिकांसह आठ डॉक्टर व १२० स्वयंसेवक कार्यरत होते. स्पर्धा संपल्यानंतर सायकलपटूंना फिजिओथेरपी, स्ट्रेचिंगच्या प्रात्यक्षिकासंह मार्गदर्शन करण्यात आले. 

 

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीkolhapurकोल्हापूर