शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’साठीे अर्ज भरायला झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी, दुसºया दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. दुसºया दिवशी विविध गटांतून तब्बल ४६९ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत ५२४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत ११९३ अर्जांची विक्री झाली आहे.आज, मंगळवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी, दुसºया दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. दुसºया दिवशी विविध गटांतून तब्बल ४६९ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत ५२४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत ११९३ अर्जांची विक्री झाली आहे.आज, मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.‘बिद्री’ कारखान्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अचानक कार्यक्रम जाहीर झाल्याने शुक्रवारी केवळ ५५ जणांनीच अर्ज दाखल केले. शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने सोमवारी दुसºया दिवशी इच्छुकांसह समर्थकांची तोबा गर्दी झाली होती. सकाळी अकरा वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर फुलून गेला होता. अर्ज विक्रीची व्यवस्था प्रांत कार्यालयाच्या तळमजल्यात करण्यात आली असून परिपूर्ण अर्ज पहिल्या मजल्यावर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी स्वीकारले. सकाळपासूनच इच्छुकांची कागदपत्रे गोळा करून अर्ज दाखल करण्यासाठी पळापळ सुरू होती तर माजी आमदार दिनकरराव जाधव, राहुल देसाई, भूषण पाटील यांच्यासह दोन्ही गटांचे नेते तळ ठोकून होते.सोमवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये दिनकरराव जाधव, ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, माजी संचालक पंडितराव केणे, माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक नाथाजी पाटील, बालाजी फराकटे, नंदकिशोर सूर्यवंशी, के.जी. नांदेकर, उमेश भोईटे, रमेश वारके, भरत पाटील आदींचा समावेश आहे.