शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ संस्थेमुळे दिव्यांगांना मिळतोय आत्मसन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:01 IST

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : सामाजिक बांधिलकी जोपासत शिरोळ तालुका व परिसरातील दिव्यांगांना आधार देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्था काम करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम दिव्यांगांसाठी राबविण्यात येत आहेत.नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्था दिव्यांग, अंध, ...

संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : सामाजिक बांधिलकी जोपासत शिरोळ तालुका व परिसरातील दिव्यांगांना आधार देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्था काम करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम दिव्यांगांसाठी राबविण्यात येत आहेत.नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्था दिव्यांग, अंध, मतिमंद, कर्णबधीर यांच्यासाठी गेले दहा वर्षे कार्य करीत आहे. ० ते १८ वर्षापर्यंतच्या दिव्यांगांचे शिबिर व शस्त्रक्रिया कॅम्प घेण्यासाठी संस्था नेहमीच पुढे असते. दिव्यांगांना स्वावलंबी बनता यावे तसेच समाजात निर्भीडपणे जगता यावे, यासाठी शासकीय विद्यानिकेतनच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरु आहे.विविध सामाजिक संस्थांकडून दिव्यांगांचा तपासणी कॅम्प घेऊन त्यांना जयपूर फुटचे वाटप करण्यात येते. जयसिंगपूर येथील मोदी हॉस्पिटलमार्फत मतिमंद मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. मतिमंद मुलांच्या पालकांना त्यांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शनही करण्यात येते. दिव्यांग, अंध, मतिमंद, कर्णबधीर, मूकबधीरांना वर्षातून एकदा तीर्थक्षेत्र दर्शन घडविण्यासाठी गेली सात वर्षे शिखरजी यात्रेचे आयोजन करण्यात येते.दिव्यांगांसाठी वसतिगृह असावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षभराच्या अथक प्रयत्नानंतर जयसिंगपूर-नांदणी मार्गावर आदिनाथ पार्क याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. हे विद्यार्थी नांदणी हायस्कूल, नांदणी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी शाळेची बससेवादेखील सुरु आहे.दिव्यांग संस्थेचा शिरोळ, हातकणंगले, सांगली, कर्नाटक, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी येथील विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.जयपूर फूट, क्रीडा स्पर्धा, तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कर्जप्रकरण अशा सुविधा त्यांना मिळत आहेत. त्याचबरोबर संस्थेच्यावतीने विविध वस्तुंचे वाटपही केले जाते. एकूणच समाजाने व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अशा मुलांना आपलेसे मानण्याची गरज आहे. अशा सामाजिक संस्थांना पाठबळ देवून दिव्यांगांचे भविष्य घडविण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याची अपेक्षा दिव्यांगांतून व्यक्त होत आहे.एस. टी. वाहकांचा सत्कारपरिसरातील दिव्यांग, अंध, मतिमंद, कर्णबधीर, मूकबधीर तसेच अनेक व्याधीग्रस्त लोक बसमधून प्रवास करताना अंधांची काठी व अपंगांचे हातपाय हे वाहकच बनत असतात. त्यामुळे दिव्यांगांना त्यांची मोठी मदत होते. त्यांचा संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येतो. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश जांगडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, सचिव विद्यासागर पाटील, संचालक, आदी सतत प्रयत्नशील असतात.लोकप्रतिनिधींकडून मदतशिरोळ तालुक्यासह शेजारील सांगली जिल्ह्यातील सामाजिक, उद्योजक व राजकीय लोकप्रतिनिधींकडून दिव्यांगांना जयपूर फूट देण्यात आले आहेत. त्याचा लाभ कोल्हापूर व सांगली येथील दिव्यांगांना झाला आहे. श्रावणबाळ विकलांग वसतिगृहात शिरोळ व हातकणंगले व कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगपती, डॉक्टर, तरुण मंडळे, ट्रस्टकडून अन्नधान्याबरोबर वस्तूस्वरुपात मदत होत आहे.