शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा मंदिरात चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:54 IST

कोल्हापुरात श्री जोतिबा देवाची शुक्रवारी श्रावण षष्ठी यात्रा भरली व शनिवारी चांगभलेच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता झाली आहे. 

कोल्हापूर, दि. 29 -  श्री जोतिबा देवाची शुक्रवारी श्रावण षष्ठी यात्रा भरली व शनिवारी चांगभलंच्या गजरात श्रावण षष्ठीची सांगता झाली आहे. श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी व जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरातील चोपडाईदेवीची श्रावण षष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले होते.  चैत्र यात्रेनंतर भरणारी ही दुसरी मोठी यात्रा असते. दोन ते अडीच लाख भाविक मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर भागातून येथे येतात.

जोतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात भरणारी श्रावण षष्ठी यात्रा ही श्री चोपडाई देवीसाठी भरवली जाते. भाविक चोपडाई देवीला साडीचोळी अर्पण करतात.  शुक्रवारी धुपारती करण्यात आली. तर रात्रभर मंदिरात धार्मिक विधि सुरू होत्या. श्री चोपडाई देवीची लिंबू, बेलपत्र, पाना-फुलांची आकर्षक महापूजा बांधली जाते. रात्रभर भाविक जोतिबाच्या डोंगरावर येत असतात. स्थानिक पुजार्‍यांच्या घरी मुक्काम करतात. सर्व भाविक षष्ठीचा उपवास करतात.  दोन दिवस सुरू असलेल्या या यात्रेची सांगता शनिवारी सकाळी सात वाजता धुपारतीनं,  चांगभलंच्या गजरात व जल्लोषात करण्यात आली.