शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

‘सोशल मीडिया’वर विजयाच्या दावे-प्रतिदाव्यांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:19 AM

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर निकालाचा अंदाज, विजयाच्या दावे-प्रतिदाव्यांचा वर्षाव सुरू आहे. काहींनी आपल्या उमेदवाराला विजयाच्या ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर निकालाचा अंदाज, विजयाच्या दावे-प्रतिदाव्यांचा वर्षाव सुरू आहे. काहींनी आपल्या उमेदवाराला विजयाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्या आहेत.या निवडणुकीत सोशल मीडियावर प्रचार रंगला. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील गटाने ‘आमचं ठरलंय’ अशी आणि महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी ‘स्वाभिमान कोल्हापूर’चा ही टॅगलाईन चालविली. त्याला ‘महाडिकांना जनतेनेच ठरवलंय,’ ‘आपला माणूस’ अशा टॅगलाईनने खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाने प्रत्युत्तर दिले. त्याची दखल ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ असे म्हणत खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतली. अशा पद्धतीने मतदान होईपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात ‘सोशल वॉर’ रंगले. हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यातील ‘सोशल वॉर’ची तीव्रता कमी होती. मतदानानंतर निवडणुकीबाबतच्या सोशल मीडियावरील संदेशांचे प्रमाण कमी झाले. गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला किती मते, मताधिक्य मिळणार, सन २०१४ च्या निवडणुकीत किती मते मिळाली होती, आपलाच उमेदवार कसा आणि किती मताधिक्याने विजयी होणार, विविध सर्व्हेतून समोर आलेले निकालाचे चित्र, विजयाच्या दावे-प्रतिदावे करणाºया संदेशांचा व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकवर वर्षाव होत आहे. काही समर्थक, कार्यकर्त्यांनी विजयाच्या शुभेच्छा देणाºया जाहिराती व्हायरल केल्या आहेत. त्यामध्ये कौलव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांची जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे. येत्या २३ मे रोजी घ्यावयाची काळजी, यादिवशी सर्व राजकीय पक्ष कोणती गाणी म्हणणार, आदी आशय आणि त्याला पूरक असणाºया छायाचित्रांचा समावेश असलेल्या मजेदार संदेशांची गर्दी झाली आहे. मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार, त्यासाठी किती वेळ लागणार, अशा स्वरूपातील माहितीचे संदेशदेखील ‘सोशल मीडिया’वर फिरत आहेत.अ‍ॅडमिनवर गुन्हानिवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे काही मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यास संबंधित पोस्ट व्हायरल करणारा आणि त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परिक्षेत्रातील सायबर शाखांना या विशेष सूचना दिल्या आहेत. विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केलेल्या पोस्ट कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाºया असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.शुभेच्छांच्या जाहिराती व्हायरल;मजेदार संदेशांनी करमणूककोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे नाव : ज्याच्या नावामध्ये ‘जय’ आहे, ज्याचे आडनाव ‘चार’ अक्षरी आहे, ज्याच्या आडनावामध्ये पहिले अक्षर ‘म’ आणि शेवटचे अक्षर ‘क’ आहे.कोणी कितीही उड्या मारू दे, गुलाल फक्त आमचाच - एक गुलाल विक्रेता.जर कोणत्याच पक्षाला बहुमत नाही मिळाले, तर डकवर्थ लुईस नियमानुसार राज ठाकरे हे पंतप्रधान होणार!बरं झालं, त्या निवडणुकीप्रमाणे शाळेच्या निकालाचा एक्झिट पोल नावाचा प्रकार नव्हता. नाही तर घरच्यांनी तीन-चार दिवस अगोदर मारायला सुरुवात केली असती.