शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

शाहू समाधिस्थळावरून टोलेबाजी : कोल्हापूर महापालिका सभा, आरोप-प्रत्यारोपांचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:34 AM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय टोलेबाजी करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला. या उद्वेगजनक प्रकाराने काही नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देउद्वेगजनक प्रकाराने संतापसमाधिस्थळाच्या बांधकामाचा पाठपुरावा करण्याचा संकल्प

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय टोलेबाजी करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला. या उद्वेगजनक प्रकाराने काही नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अखेर तासाभराच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर भानावर आलेल्या नगरसेवकांनी झाले गेले विसरून समाधिस्थळाच्या बांधकामाचा पाठपुरावा करण्याचा संकल्प केला.

शाहू समाधिस्थळाकरिता द्याव्या लागणाऱ्या निधीच्या मंजुरीसाठी महापौर सरिता मोरे यांनी बुधवारी विशेष सभा आयोजित केली होती. सभेत ७० लाखांचा निधी देण्याच्या प्रस्तावास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली; परंतु या विषयावर झालेल्या चर्चेतून अवमान आणि गैरसमज झाले. त्यातून सत्तारूढ कॉँग्रेस-राष्टÑवादी आणि भाजप-ताराराणी आघाडी असे दोन गट पडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.महापालिकेने समाधिस्थळ स्वनिधीतून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही त्याच्या कामास राज्य सरकारने तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी दिला नाही, असा राजकीय आरोप कॉँग्रेस-राष्टÑवादीकडून करण्यात आला. त्यातच उपमहापौर भूपाल शेटे यांनी सरकार जर काही देणार नसेल, तर आपण ‘झोळी’ घेऊन पैसे गोळा करू आणि समाधिस्थळ बांधून पूर्ण करू, असे सांगितले.

शेटे यांच्या या वक्तव्यावरून सभेत ठिणगी पडली. त्यांच्या वक्तव्यावर हरकत घेत सत्यजित कदम, सुनील कदम, विलास वास्कर, राजसिंह शेळके, किरण शिराळे, किरण नकाते यांनी हरकत घेतली. शब्द मागे घ्या, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. तसेच शाहू महाराजांच्या समाधिस्थळासाठी ‘झोळी’ घेऊन का पैसे मागायचे, सरकार आणि महापालिका निधी देण्यासाठीच आहेत. शाहू महाराजांचा अवमान होईल, असे कोणतेही वक्तव्य करू नका, अशी समज दिली. माजी महापौर हसिना फरास यांनीही शेटे यांना तुमचा शब्द मागे घ्या, अशी सूचना केली. त्यानंतर तत्काळ शेटे यांनी दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकला. आपणाला लोकसहभागातून समाधिस्थळ विकसित करू, असे म्हणायचे होते, असा खुलासा त्यांनी केला.

विरोधी बाकावरील सदस्य तरीही शांत झाले नाहीत. सत्यजित कदम यांनी तर तुम्ही सरकारकडे कधी प्रस्ताव पाठविला, पालकमंत्र्यांकडे कधी चर्चेला गेला सांगा, असे आव्हान दिले; त्यामुळे सत्तारूढ गटाचे शारंगधर देशमुख यांनाही स्वत:ला आवरता आले नाही. समाधिस्थळासाठी सरकारने चार आणे दिलेले नाहीत. निधी मागायला कशाला हवा ? त्यांना द्यावा असे का वाटले नाही? त्यांना लाज कशी वाटली नाही? भाषणात १0 वेळा शाहू महाराज यांचे नाव घेता, तर मग निधी द्यायला कमीपणा कसला वाटतो? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे सभेतील वादंग अधिकच वाढले. शेवटी विरोधी गटाच्या सर्व सदस्यांनी राजकीय संघर्ष टाळण्याकरिता समाधिस्थळाच्या निधीला मंजुरी देऊन सभागृहातून काढता पाय घेतला. त्यांना नंतर रोखण्याचा प्रयत्न झाला; परंतु सर्वांनी सभागृह सोडले. 

हसिना फरास ‘आई’च्या भूमिकेतमाजी महापौर हसिना फरास यांनी समाधिस्थळाच्या कामाचा सतत पाठपुरावा करत आहोत. बुधवारच्या सभेत सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने व्यथित झालेल्या फरास यांनी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना समजावले. किमान समाधिस्थळाच्या कामावरून तरी एकमेकांवर आरोप करू नका, अशा शब्दांत बजावले. एवढेच नाही तर त्यांनी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हातातील माईक काढून घेऊन तुमचे वक्तव्य बरोबर नाही, शब्द मागे घ्या, असे सांगितले. वेगळे वळण लावायला नको, एकमताने विषय मंजूर करा, शांत बसा, असेही त्यांनी अधिकारवाणीने सर्वांना सांगितले.मृत्यू झालेल्या ठिकाणची माती

राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज परिसरातील माती आणलेला कलश आदिल फरास, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत यांनी महापौर मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. ही समाधिस्थळाच्या ठिकाणी दगडी पेटीत ठेवली जाणार आहे.

 

विरोधी गटाचे नगरसेवक पुन्हा सभागृहातविरोधी गटाचे सर्व नगरसेवक सभागृहातून बाहेर पडल्याचे लक्षात येताच, माजी स्थायी सभापती आदिल फरास, महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार मोरे धावतच महापालिका चौकात गेले. त्यांनी विरोधी गटाच्या नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांच्या समाधिस्थळाचा विषय आहे, तुम्ही सभागृहातून बाहेर पडणे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांची समजूत काढली. त्याचवेळी हसिना फरास यादेखील चौकात आल्या. महाराजांचा अवमान होईल, असे कोणी वागू नका, असे फरास यांनी सांगितले. चर्चा, राजकीय आरोप करायचे नाहीत, या अटींवर नगरसेवक पुन्हा सभागृहात पोहोचले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका