शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे यांचे राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिस अभिवादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:08 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा घेण्यासाठी कोल्हापूरात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी येथील एका हॉटेलमध्ये सकाळी भेट घेतली. दरम्यान, ही भेट घरगुती असून यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे महाडिक म्हणाले.

ठळक मुद्देराजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादनखासदार धनंजय महाडिक यांनी घेतली राणे यांची भेट पंचशील हॉटेल समोर राणे यांच्या स्वागतासाठी उभी केलेली कमान पडली

कोल्हापूर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यानी शुक्रवारी कसबा बावडा येथील राजर्षि शाहू जन्मस्थळ येथे राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले. 

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत,व इतर उपस्थित होते.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा घेण्यासाठी कोल्हापूरात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी येथील एका हॉटेलमध्ये सकाळी भेट घेतली. दरम्यान, ही भेट घरगुती असून यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे महाडिक म्हणाले.काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच जाहीर सभा कोल्हापूर येथे आज, शुक्रवार दि. ८ रोजी होत आहे.

या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून राहिले असतानाच पंचशील हॉटेल समोर नारायण राणे यांच्या स्वागतासाठी उभी केलेली कमान उभी अचानक पडली. ही कमान रस्त्यावरून जाणाऱ्या एक तरुणांच्या अंगावर पडली. मात्र, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, असे ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, शहरातील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या नारायण राणे यांची खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली. २00४ पासून महाडिक परिवाराशी नारायण राणे आणि कुटूंबियांशी संबंध आहेत. राणे हे कोल्हापूरात आले असल्यामुळे त्यांची भेट घेणे अगत्याचे होते. त्यांचा आणि महाडिक परिवाराचा घरगुती स्वरुपाचा संबंध असल्यामुळे यातून कोणीही राजकीय अर्थ काढू नये, असे धनंजय महाडिक म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक