कोल्हापूर : पार्श्वगायक मोहंमद रफी यांच्या जयंतीनिमित्त मोहंमद रफी आर्ट फौंडेशनतर्फे महालक्ष्मी अन्नछत्र सेवा (शिवभोजन केंद्र) येथे दोनशे गरजूंना मोफत जेवण देण्यात आले आहे.
यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष सैफुद्दीन मुल्ला, गायक चंद्रकांत आलमेलकर, इब्राहिम अत्तार, निजामुद्दिन काझी, नाजीम मकानदार, राज शेख, इरफान बागवान उपस्थित होते. उपक्रमाला अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांचे सहकार्य लाभले.
--
मानाच्या जगांना परवानगी हवी
कोल्हापूर : सौंदत्ती येथे होणाऱ्या यात्रेसाठी कोल्हापुरातील मानाच्या चार जगांना कर्नाटक जिल्हा प्रशासनाने परवानगी देणे गरजेचे होते.
या यात्रेला जिल्ह्यातील लाखो लोक जातात, तेथून जग परतल्यानंतर ओढ्यावर अंबील यात्रा होते. या जगांना यात्रेत विशेष मान आहे. मात्र, कर्नाटक जिल्हा प्रशासनाने जगांनादेखील परवानगी दिली नाही. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी आहे, असे अच्युत साळोखे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
--