कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सोमवारी (दि.२०) दुपारी २ वाजता महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी पीडित महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी केले आहे.
---
अल्पसंख्याक ऑनलाइन जॉब फेअर २३ व २४ सप्टेंबरला
कोल्हापूर : जिल्हा कौशल्यविकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २३ व २४ सप्टेंबर रोजी अल्पसंख्याक ऑनलाइन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक युवक- युवतींनी २४ सप्टेंबरपर्यंत आपले ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, विमा प्रतिनिधी, सीएनसी, व्हीएमसी ऑपरेटर, मशीन शॉप सुपरवायझर, स्टोअर असिस्टंट, इन्शुरन्स ॲडव्हायझर, ॲडव्हायझर, टेली को-ऑर्डिनेटर, अशी दहावी ते पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, बीई, आयटीआय या शैक्षणिक पात्रतेची जिल्ह्यातील नामांकित ७ आस्थापनांची १५१ पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करून नोंदणी करावी. उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार २४ तारखेला त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उद्योजकांकडून कळविण्यात येईल.
---