कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे व मार्गदर्शन करण्यासाठी समाजकल्याण आयुक्त कार्यालयात ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आले आहे.
या कक्षाचे उद्घाटन फेस्कॉमचे अध्यक्ष सी. के. नलवडे यांच्या हस्ते झाले. या कक्षाद्वारे वृध्दांसाठीच्या सर्व योजना एकाच छत्राखाली आल्या असून त्याचा लाभ वृद्धांना होणार आहे. विशाल लोंढे यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा डवर यांनी सूत्रसंचालन व कल्पना पाटील यांनी आभार मानले. या वेळी प्रमोद फडणीस, दिलीप पठेकर, लता कदम, मंगल पाटील, अशोक जाधव, दत्तात्रय पाटील, नीलम गायकवाड व सचिन कांबळे उपस्थित होते.
---
महिला तक्रार समिती स्थापन करा
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व खासगी आस्थापनामध्ये महिला तक्रार समिती स्थापन करून त्याचा अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुजाता शिंदे यांनी शुक्रवारी केले.
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध महिलांना दाद मागता यावी, यासाठी राज्य शासनाने सर्व कार्यालयांमध्ये तक्रार समिती स्थापन करणे गरजेचे आहे. अन्यथा कार्यालय प्रमुखांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड व प्रसंगी आस्थापनेचा परवाना रद्द करणे, दुप्पट दंड अशी कारवाई केली जाईल.
----