शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून सरसकट दुकाने सुरु होणार : आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 19:08 IST

CoronaVirus In Kolhapur : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून सरसकट दुकाने सुरु होणार : आरोग्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या खाली

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच कोल्हापूर जिल्हा आता स्तर ३ वर आला असल्याचे सांगत परवानगी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यातून होत होती. प्रायोगिक तत्वावर मागच्या आठवड्यात तशी परवानगीही देण्यात आली. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी काही कमी होत नसल्यामुळे सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली आणि निवेदन देऊन सरसकट सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली.

त्यावेळी त्याचठिकाणी उपस्थित असलेल्या महानगरपालिका प्रशासक डॉ. कादबंरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे आरोग्य मंत्र्यांनी विचारणा केली. तेव्हा प्रशासक बलकवडे यांनी सांगितले की, कालच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अहवाल आला असून, जिल्ह्याची कोरोनाबाधितांची टक्केवारी दहाच्या खाली आल्याचे म्हटले आहे.जिल्ह्यातील बाधितांची टक्केवारी दहाच्या खाली आली असेल तर मग सोमवारपासून सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. व्यापाऱ्यांनी काळजी करु नये, कोल्हापूरचा समावेश स्तर ३ मध्ये होणार आहे, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.आरोग्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सतीश माने, शाम बासरानी, अनिल पिंजानी, दर्शन गांधी, विपुल पारेख, माणिक पाटील चुयेकर, प्रताप पवार, किरण नकाते, जयंत गोयानी, मनोज बहिरशेठ, शाम जोशी, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.जनता बझार चौकात सभा जनता बाजार चौक येथे राजारामपुरीतील व्यापार्‍यांची सभा झाली. यावेळी सोमवारपासून सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ललित गांधी यांनी सभेत सांगितली. आतापर्यंतच्या लढ्याची तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीची माहिती देऊन आरोग्यमंत्र्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचे आदेश देण्याचे मान्य केल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रमुख व महापालिका आयुक्त यांनीसुद्धा सकारात्मक अहवाल देऊन व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठबळ दिल्याचे गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीRajesh Topeराजेश टोपेkolhapurकोल्हापूर