शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Indian Army Agniveer: शॉकिंग! स्टेरॉइडच्या जिवावर अग्निवीर सैन्यात जाणार; तरुण बेशुद्ध पडल्याने प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 11:11 IST

अग्निवीर भरतीच्या तरुणांना स्टेरॉइडचा विळखा, भरतीस्थळी इंजेक्शनचा खच : ओव्हरडोसमुळे तरुण बेशुद्ध

- उद्धव गोडसेलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात सुरू असलेल्या अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेत तात्पुरत्या ऊर्जेसाठी तरुणांकडून स्टेरॉइडचा वापर सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी स्टेरॉइडच्या ओव्हरडोसमुळे एक तरुण बेशुद्ध पडल्याने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेची तारांबळ उडाली. भरतीस्थळी असलेल्या स्वच्छतागृहात तर स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा अक्षरश: खच पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यान होणारा स्टेरॉइडचा वापर आणि बाजार उघडकीस आला आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याच्या चाचणीत तरुणांसमोर प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत मागे पडणारा मागेच राहतो, त्यामुळे धावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉइड इंजेक्शनचा वापर केला जातो. चाचणी सुरू होण्याआधी काही मिनिटे हे इंजेक्शन घेतल्यानंतर तरुणांमध्ये तात्पुरती ऊर्जा वाढते, परिणामी स्पर्धेत त्याची धावण्याची गती वाढते. 

दोन दिवसांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील तरुण भरती प्रक्रियेसाठी आले होते. मध्यरात्रीनंतर एका तरुणाने हे इंजेक्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. तरुण बेशुद्ध पडताच त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. तातडीने उपचार केल्याने अनर्थ टळला.

पाच हजारांना एक इंजेक्शन?nअनेक उमेदवार येतानाच स्वत:सोबत स्टेरॉइडचे इंजेक्शन घेऊन येतात. सायबर चौकात स्टेरॉइडच्या इंजेक्शनची विक्री करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याचीही माहिती मिळाली. nपाच हजार रुपयांना एका इंजेक्शनची विक्री केली जात आहे, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या तरुणांचे अज्ञान आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन हजारो रुपयांची लूट सुरू असल्याचेही समोर येत आहे.

तपासणीची गरजकडेकोट बंदोबस्तात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान तरुणांकडे स्टेरॉइडचे इंजेक्शन मिळणे हे अत्यंत धक्कादायक आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन तरुण हे इंजेक्शन घेत आहेत, पण प्रवेशद्वारावरच त्यांच्या बॅगची तपासणी का होत नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सैन्य भरती, पोलिस भरती आणि खेळांमध्ये ऊर्जावर्धक इंजेक्शनच्या वापरास परवानगी नाही. त्याच्या वापराने तात्पुरती ऊर्जा आणि उत्साह वाढतो, पण त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान