शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज : पन्हाळगडावर बसणार शिवस्नुषा ताराराणींच्या शौर्यगाथेचा लेख

By संदीप आडनाईक | Updated: January 1, 2024 13:19 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा ...

संदीप आडनाईककोल्हापूर : जेथे स्वराज्याची राजधानी होती त्या शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती ताराराणी यांची शौर्यगाथा मांडणारा कोरीव लेख पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका नव्या वर्षात बसवणार आहे.ज्येष्ठ इतिहासकार व ताराराणींचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन माळी, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रयत्नातून ही प्रदीर्घकाळ टिकणारा कोरीव लेख पन्हाळगडावरील ताराराणींच्या राजवाड्यासमोर लवकरच विराजमान होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष निधीची उपलब्धता करण्याचे नियोजन आहे.छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी (जन्म : १४ एप्रिल १६७५, मृत्यू : ९ डिसेंबर १७६१) अवघ्या २५ वर्षांच्या असताना औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, मुघल सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला. पन्हाळगडावर त्यांनी १७०५ मध्ये राजधानी बनविली आणि राज्य कारभार केला. त्याची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आणि ठिकाणे पन्हाळ्यावर आजही पाहायला मिळतात. पन्हाळा गिरीस्थान नगरपालिका आणि पन्हाळा विद्यामंदिर ज्या जागेत आहे, ती वास्तू ताराराणींचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या राजवाड्यासमोरच पन्हाळावासीयांकडून त्यांच्या सन्मानार्थ हा कोरीव लेख बसविण्यात येत आहे.डॉ. पवार यांनी या कोरीव लेखासाठी १५ ते २० ओळींचे प्रेरणादायी लिखाण केले आहे. यावर नेमक्या शब्दांत ताराराणींची कर्तबगारी मांडण्यात येणार आहे. त्यात ताराराणींबद्दल स्वराज्याचा शत्रू असलेल्या व्यक्तींच्या उद्गारापासून कवी देवदत्त, कवी गोविंद आदींच्या कवितांचा समावेश आहे. मराठ्यांचा कट्टर शत्रू, औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान, भीमसेन सक्सेना याने काढलेले गौरवाद्गार, अलीकडच्या काळातील मराठा इतिहासाचे अभ्यासक आणि अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठात प्राध्यापक डॉ. रिचर्ड मॅक्सवेल इटन यांचे मत यांचा समावेश या कोनशिलेवर असणार आहे.

महाराणी ताराराणी यांनी कमी वयात अभूतपूर्व संघर्ष करत स्वराज्याचे रक्षण केले. करवीरसारख्या छोट्याशा राज्याची एक राणी सलग ७ वर्षे जगातील बलाढ्य सम्राट औरंगजेबाशी लढा देते असे उदाहरण जगाच्या इतिहासात अन्यत्र नाही, तिची बरोबरी करणारे जगाच्या इतिहासात कोणीही झालेले नाही, यावर जगप्रसिद्ध इतिहासकार डॉ. इटन यांनी शिक्कामोर्तब केले आहे. -डाॅ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर