शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा कल भाजपकडे...

By admin | Updated: March 20, 2017 01:03 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न; उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षात शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांचा कल भाजपकडे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे पारडे जड वाटत असले तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न पाहता सत्तेचा लंबक दोलायमान अवस्थेतच आहे. भाजता आणि दोन्ही कॉँग्रेसदरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीचा संघर्ष २३ फेब्रुवारीपासून सुरू आहे. शिवसेनेला १० जागा मिळाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व आले; परंतु ‘मातोश्री’चा स्वतंत्र आदेश येणार नसल्याचे स्पष्ट असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या पुढच्या विधानसभेचा विचार करून आपापल्या भूमिका घेतल्याचे रविवारी स्पष्ट झाले. सायंकाळी रेसिडेन्सी क्लबवर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेचे नेते संजयबाबा घाटगे, आदींनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य अंबरीश घाटगे हेदेखील होते. हे सर्वजण चर्चा करून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक हेही ‘रेसिडन्सी’वर दाखल झाले. गेल्या दोन दिवसांमध्ये महाडिक थेट या मैदानामध्ये उतरल्याने या सत्तासंघर्षातील काही मोहऱ्यांनी आपली भूमिका भाजपला पूरक अशी घेण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे रविवारी सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्याआधीच मुंबईत आमदारांची आणि त्यांची काही प्रमाणात चर्चा झालीच होती. रविवारी संध्याकाळी याबाबत पुन्हा शिक्कामोर्तब झाल्याने शिवसेनेचे बहुतांश सदस्य भाजपसोबतच जातील, अशी शक्यता बळावली आहे. दरम्यान, कॉँग्रेसने या निवडणुकीसाठी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी संध्याकाळी हॉटेल सयाजीवर सतेज पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याशी सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. आवाडे यांचा बंडा मानेंसाठी आग्रहराहुल पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला अध्यक्षपद देऊन रिस्क घेण्यापेक्षा बंडा माने या माजी उपाध्यक्षांचे नाव प्रकाश आवाडे यांनी समोर आणले आहे. निरीक्षक रमेश बागवे यांच्यासमोर त्यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे आणखी काही मते मिळतील, असा दावा त्यांनी केला. एक-दोघे गैरहजर राहण्याची शक्यताएकीकडे भाजपने शिवसेनेच्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांशी स्वतंत्र चर्चा करून सकारात्मक पावले उचलली असून, त्यांना तसा प्रतिसादही मिळाला आहे. शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच्याही पुढे जात दगाफटका होऊ नये यासाठी राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमधील एक-दोन जणांना गैरहजर ठेवण्याची क्लृप्तीही ‘भाजता’कडून लढविली जाण्याची शक्यता आहे. अरूण दुधवडकर आज करणार चर्चाशिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर हे सोमवारी कोल्हापुरात येणार असून ते सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाप्रमुख व शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. आवाडे आमच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निरोप प्रकाश आवाडे यांना दिला आहे. त्यामुळे आवाडे पक्षासोबतच राहतील, असा विश्वास निरीक्षक माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला आहे. मी आणि मुश्रीफ यांनी आवाडे यांच्याशी चर्चा केली असून, ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. अध्यक्ष आमचाच : चंद्रकांतदादाकाहीही झाले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सत्ता बनविण्यासाठी मुंबईहून कोल्हापूरला आलो आहे, असे सांगत पाटील यांनी आपला आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला. सतेज-मुश्रीफ यांनाही सत्तेचा विश्वाससंध्याकाळी आमदार सतेज पाटील आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कॉँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. आमची गोळाबेरीज झाली असून सत्ता संपादन करण्यात कोणतीच अडचण नसल्याचे या दोघांनी सांगितले.