शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रताप दिनाला उध्दव ठाकरे येणार

By admin | Updated: November 18, 2014 23:37 IST

मिलिंद एकबोटे : प्रतापगड उत्सव समितीला मुख्यमंत्र्यांची परवानगी

सातारा : ‘प्रतापगड उत्सव समितीतर्फे यंदाचा शिवप्रतापदिन प्रतापगडावरच साजरा करणार आहे. शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली असून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती प्रतापगड उत्सव समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तब्बल दहा वर्षांनंतर प्रतापगडावर उत्सव समितीला गडावर उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मिलींद एकबोटे याबाबत बोलताना म्हणाले, ‘प्रतापगडावर हिंदुस्थानच्या पुनरुत्थानाचा देदिप्यमान आणि प्रेरणादायी इतिहास घडला होता. शिवप्रभूंच्या त्या पराक्रमाची आठवण महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठीच प्रतिवर्षी आपण शिवप्रतापदिन साजरा करतो; परंतु यंदा हा उत्सव प्रतापगडावरच साजरा करण्याची संधी आपल्याला लाभली आहे. या सोहळ्याला भिडे गुरुजी, शिवसेना नेते दिवाकर रावते, विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रा. व्यंकटेश आबदेव, विजयाताई भोसले, राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.’दरम्यान, १९९६ सालापासून प्रतापगड उत्सव समितीतर्फे हा उत्सव साजरा केला जात आहे. गडावरील अफजलखानाच्या कबरीच्या बांधकामावरुन वाद निर्माण झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी दंगलही घडली होती. यानंतर प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाचा उत्सव जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थित साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या नऊ वर्षांपासून प्रशासन हा उत्सव साजरा करत आहे. २00५ व २00६ साली प्रतापगड उत्सव समितीने राजगडाच्या पायथ्याला स्वतंत्रपणे उत्सव साजरा केला. त्यानंतर वाई शहरात हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मागील वर्षी पुण्यामध्ये हा उत्सव साजरा झाला होता. उत्सव समितीचा वाई व पुणे येथे उत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)