शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

‘शिवाजी’कडून ‘शिवनेरी’चा धुव्वा

By admin | Updated: December 30, 2016 00:45 IST

केएसए वरिष्ठ गट फुटबॉल : पीटीएम ‘ब’ची गोल्डस्टारवर मात

कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल साखळी स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने पिछाडीनंतर आघाडी मिळवीत शिवनेरी स्पोर्टस् संघाचा १२-१ अशा गोलफरकाने धुव्वा उडविला; तर पीटीएम ‘ब’ने गोल्डस्टार स्पोर्टस्वर ४-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. छत्रपती शाहू स्टेडियमवर दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस् यांच्यामध्ये खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभी १३ व्या मिनिटाला शिवनेरी स्पोर्टस्च्या सैद नदाफने गोल करीत संघाचे खाते उघडले. या गोलनंतर मात्र शिवाजी तरुण मंडळाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये २१ व्या मिनिटाला क पिल साठेने गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. पाठोपाठ ३१ व्या शिवाजी तरुण मंडळाकडून निखिल जाधवने गोल करीत सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत शिवाजी तरुण मंडळ आघाडीवर होते. उत्तरार्धातील संपूर्ण सामन्यावर शिवाजी तरुण मंडळाने पकड निर्माण केली. यामध्ये या मंडळाकडून ४५ व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने, ४८ व्या मिनिटाला निखिल जाधवने, ५३ व्या मिनिटाला डायसने, ५५ व्या मिनिटाला निखिल जाधवने वैयक्तिक दुसरा व संघाचा सहावा गोल केला. ५६ व्या मिनिटाला अनिल साठे याने गोल केला. ६३ व्या मिनिटाला वैभव राऊतने संघाचा आठवा गोल केला. ६६ व्या मिनिटाला कपिल साठेने वैयक्तिक दुसरा व संघाचा नववा गोल केला. ७१ व्या मिनिटाला निखिल जाधवने गोल केला. ७८ व्या मिनिटाला कपिल साठेने वैयक्तिक तिसरा व संघाचा ११ वा गोल केला. पाठोपाठ ८० व्या मिनिटाला ऋतुराज पाटीलने गोल केला. अशा प्रकारे शिवाजी तरुण मंडळाने सामन्यात १२-१ अशा गोलफरकाने भक्कम आघाडी घेतली. ती सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. शिवनेरी संघाकडून नीलेश ढोबळे, रोहित खंचनाळे, अनिकेत सरनाईक, सुमित कदम यांनी चांगला खेळ केला. पहिला सामना पीटीएम ब विरुद्ध गोल्डस्टार यांच्यामध्ये झाला. सामन्यात पीटीएम ‘ब’ने ४-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. यामध्ये ‘पीटीएम’कडून प्रथमेश दरेकर, शुभम मोहिते, प्रथमेश हेरेकर, रोहन कांबळे यांनी गोल केले, तर गोल्डस्टारकडून सनी सावंतने गोल केला. केएसए वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात गुरुवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस यांच्यामध्ये झालेल्या सामन्यातील एक क्षण.