शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत प्रथमच घुमणार ‘शिवगर्जना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:46 IST

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यंदा प्रथमच दिल्ली येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात छत्रपती शिवरायांच्या विचार कार्यावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे होणारे सादरीकरण हेच मुख्य आकर्षण राहणार आहे.खासदार संभाजीराजे यांच्या विशेष प्रयत्नांतून दिल्ली येथे शिवजयंती उत्सव होत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी राष्टÑीय कला केंद्र येथे ...

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यंदा प्रथमच दिल्ली येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात छत्रपती शिवरायांच्या विचार कार्यावर आधारित ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे होणारे सादरीकरण हेच मुख्य आकर्षण राहणार आहे.खासदार संभाजीराजे यांच्या विशेष प्रयत्नांतून दिल्ली येथे शिवजयंती उत्सव होत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी राष्टÑीय कला केंद्र येथे सोमवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजता या शिवगर्जना महानाट्याचा ५० वा प्रयोग होत आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या महानाट्याचे लेखन केले आहे. या महानाट्याचे यापूर्वी दिल्ली, जम्मू-काश्मीर, कानपूर, जामनगर (गुजरात), बिकानेर (राजस्थान), बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, अक्कलकोट, सांगली, सातारा, मंचर, पुणे, बीड या ठिकाणी प्रयोग झाले आहेत. या महानाट्यात ३०० हून अधिक कलाकारांचा समावेश आहे. ६० फूट उंच रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष वावर, चित्तथरारक लढाया, नेत्रदीपक प्रकाश योजना, नेत्रसुखद आतषबाजी, मंत्रमुग्ध संगीत, अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असे हे महानाट्य दिल्लीत शिवजयंतीदिनी आकर्षक ठरणार आहे. या महानाट्याच्या निमित्ताने शिवरायांची अस्सल पत्रे संवादरूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. छत्रपती शिवरायांच्या विचार आणि कार्याला जगभर पोहोचण्यासाठी शिवसेवा करण्याचा मानस या महानाट्यातून असल्याची भावना सर्व कलाकारांनी व्यक्त केली आहे.